Shocking video: घरातील जेष्ठ मंडळी सांगतात हॉटेलमध्ये जाऊन खाऊ नका. कारण हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या अन्न-पदार्थामधील स्वच्छतेबाबत काय संशय असतो. अनेक मोठमोठ्या हॉटेलच्या किचनमध्ये अक्षरश: उंदीर, पाली, झुरळं फिरत असतात. काही हॉटेल्समध्ये खाद्यतेल सुद्धा दुषित स्वरूपात वापरलं जातं. असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. म्हणूनच घरचं पौष्टिक खाण्याचा सल्ला दिला जातो, मात्र आता विचार करा की, घरात शिजणारं अन्नही विषारी आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं तर…आता तुम्ही म्हणाल घरात शिजवलेलं कसं विषारी असेल? तर हो घरात शिजवलं तरी ते पदार्थ आपण बाहेरुनच आणतो. उदाहरणार्थ भाऊ जरा चांगली आणि ताजी भाजी द्या…भाजी विकत घेताना हे वाक्य नेहमीच आपल्या तोंडी असतं. भाजी विकत घ्यायची म्हटली तर आपण ती भाजी ताजी आहे की नाही याची सारखी विचारणा विक्रेत्याला करत असतो. कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्ही विकत घेतलेली भाजी ही गटाराच्या पाण्यात धुतलेली आहे असं कळलं तर नक्कीच मोठा धक्का बसेल. असाच एक व्हिडीओ उल्हासगरमधून समोर आला आहे. या व्हिडीओत भाजी विक्रेता चक्क गटाराच्या वाहत्या पाण्यात भाजी बडवून स्वच्छ करत विकत असल्याचा संतापजनक प्रकार दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगरमधील खेमाणी भाजी मंडईतील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात एक भाजी विक्रेता घाणेरड्या गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुताना दिसत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असून विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. उल्हासनगर कॅम्प-२ मधील खेमाणी परिसरात अवैध भाजी मंडई सुरू असून तेथे हा प्रकार उघडकीस आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक विक्रेता केवळ दूषित गटाराच्या पाण्यात भाजीपाला बुडवताना दिसत नाही तर तेच पाणी इतर भाजांवरही शिंपडण्यासाठी बादलीचा वापर करत आहे. या धोकादायक प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याबाबत भीती निर्माण झाली आहे, कारण या भाज्या ग्राहकांच्या ताटात जात आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती अक्षरश: गाटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुताना दिसून येत आहे. हे पाणी फारच खराब आहे. ते गटाराजवळ असल्यामुळे त्या पाण्यात किती विषाणू असू शकतात याचा आपण अंदाजा देखील लावू शकणार आहे. अशीच भाजी कोणी विकत घेतली तर त्यामुळे लोक आजारी पडू शकतात.

हा व्हिडओ पाहून सोशल मीडियावर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बाजारात विकल्या जाणाऱ्या भाज्यांच्या अस्वच्छतेबाबत अनेकांनी संताप आणि चिंता व्यक्त केली आहे. आरोग्यदायी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर अनेकदा देत असताना, मात्र आताा अशा प्रकारामुळे अनेकांना त्यांच्या अन्नाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने त्वरीत कारवाई करण्याची मागणी स्थानिक राजकीय नेते आणि नागरिकांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ

उल्हासनगरचे आरोग्य अधिकारी मनीष हिवाळे यांनी हा व्हिडिओ उल्हासनगरमधील खेमाणी येथील असल्याचे पुष्टी केली. त्यांनी पुढे सांगितले की, हे कृत्य करणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर त्याचे जबाब नोंदवून त्यानुसार पुढील तपास करू.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sirajnooran नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “यांच्यावर लगेच कारवाई करा” तर आणखी एकानं “आता खायचं तरी काय, एकदाच घ्या लोकांचा जीव घ्या”” अशी प्रतिक्रिया दिली आहे.