Disgusting Video : हल्ली प्रत्येक जण काही ना काही कारणासाठी सोशल मीडियाचा वापर करताना दिसतो. केवळ तरुणाईच नाही, तर लहान मुलं, वृद्धदेखील सोशल मीडियावर आपला वेळ व्यतीत करतात. काही जण व्हिडीओ पाहण्यासाठी येतात; तर काही स्वत:च्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर करतात. आज असे अनेक लोक आहेत, जे सोशल मीडियामुळे ओळखले जातात. पण ते प्रसिद्धीसाठी अशा काही गोष्टी करतात की, ते पाहून तुम्हालाही किळस वाटेल. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात तो टॉयलेट सीटजवळ बसून असं काही घाणेरडं कृत्य करतोय की, ते पाहून अक्षरश: किळस वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॉयलेट सीटमधील पाण्यात बुडवलं बिस्कीट अन्…

तुम्ही सोशल मीडियावर काहींना कधी चिखलात लोळताना, कधी गटारातील पाण्यापासून ज्यूस बनवून पितानाचे व्हिडीओ पाहिले असतील. सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण चक्क टॉयलेट सीटमधील पाण्यात बिस्कीट बुडवून खाताना दिसतोय.

तरुणाचे विचित्र कृत्य

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण पाश्चिमात्य शौचकूपा (कमोड)जवळ बसल्याचे दिसतेय. त्याच्या हातात एक बिस्कीट आहे. यावेळी तो बिस्कीट घेऊन असं काही किळसवाणं कृत्य करतो की, ते पाहूनच कोणालाही उलटीची भावना होईल. तो तरुण ते बिस्कीट कमोडच्या पाण्यात बुडवतो आणि कसलाही विचार न करता ते खातो. तो ते बिस्कीट अशा प्रकारे चघळतो की, जसे काय तो खूप चविष्ट पदार्थ खातोय. तरुणाच्या या विचित्र कृत्याने सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ @hydeler नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, हे पाहून मला शिव्या नाहीत, तर उलट्या करायचं मन होतंय. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, बॅक्टेरियाही याला घाबरतील. तिसऱ्या युजरने लिहिले की, बुडून मर. चौथ्या युजरने लिहिले की, पुनित सुपरस्टारचा मुलगा. शेवटी एकाने लिहिले की, भावा, व्हायरल होण्यासाठी काहीही करशील का?