गेल्या काही दिवसांमध्ये फुड डिलव्हरी अॅपचा वापर खूप वाढला आहे. त्यामुले सामान्य जीवन अत्यंत सुलभ झाले आहे. ही सुविधा एक पर्याय म्हणून काम करते आणि आपला मौल्यवान वेळही वाचवते. पण जितका त्याचा वापर वाढत आहे तितकीच या अॅपद्वारे मागवलेल्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. लोक सोशल मीडियावर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत आहे. या आधी अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये लोकांनी रेस्टॉरंटच्या अन्नामध्ये झुरळ, उंदीर सापडल्याचे तक्रार केल्या आहेत. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे. बुधवारी एका महिलेने झोमॅटो अॅपवरून गुरुग्राम येथील एका रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ मागवले पण त्यामध्ये चक्क झुरळ सापडल्याची तक्रार केली जात आहे.
सोनई आचार्य नावाच्या सोशल मीडिया युजरने न्युडल्सचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये न्युडल्समध्ये असलेले झुरळ स्पष्टपणे दिसत आहे. पोस्ट शेअर करताना तिने सांगितले की, ऑटी फग नावाच्या रेस्टॉरंटमधून जपानी रामेन (Japanese ramen) हा खाद्यपदार्थ मागवला होता. त्यामध्ये झुरळ आढल्याचे तिने सांगितले आहे. तिने लिहले की, “झोमॅटोवरून खाद्यपदार्थ मागवण्याचा अनुभव भयानक होता. ऑटी फगमधून जपानी मिसो रेमन चिकन(चिकन न्युडल्स) मागवले होते आणि त्यात झुरळ सापडले. हे अजिबात स्वीकारले जाणार नाही आणि अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. येथे गुणवत्ता नियंत्रणेबाबत मी अत्यंत निराश झाले आहे. झोमॅटो अत्यंत वाईट आहे”
झोमॅटोने महिलेच्या तक्रारीची दखल घेत त्वरीत उत्तर दिले आहे. कंपनीने लिहिले की, नमस्कार, आम्हाला ही दुर्भाग्यपूर्ण घटनेबाबत ऐकून फार वाईट वाटले. आम्ही तुमचा अनुभव बदलण्याचा प्रयत्न करू इच्छितो. कृपया आम्हाला प्रकरणाची माहिती घेण्यासाठी काही वेळ द्या. आम्ही लवकरात लवकर याचा तपास करू. सोनाईद्वारे शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये असेही दिसते आहे की तिला ३२० रुपये रिफंड मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वीच बंगळुरूमधील एका रहिवासीसह असाच प्रकार घडला होता. एका महिनेने तिचा हा वाईट अनुभवन एक्सवर सांगितला होता. तिने सांगितले की, तिने मागवलेल्या खाद्यपदार्थामध्ये झुरळ सापडले. या अनुभवामुळे ती अत्यंत निराश झाल्याचे तिने सांगितले. हर्षिताने एका रेस्टॉरंटमधून फ्राईड राईस मागवला होता. तिने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार त्यामद्ये झुरळ असल्याचे दिसते. तिने सांगितले की, मी रेस्टॉरंट ‘टपरी चाय द कॉर्नर’ मधून झोमॅटोवरून चिकन फ्राईड राईस ऑर्डर केले होते. त्यात झुरळ सापडले. मी या ऑर्डरमुळे खूप निराश झाले आहे.”
हेही वाचा – ‘पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना’ आणि ‘पंतप्रधान सूर्योदय योजना’ यात नेमका काय फरक आहे?
फूड डिलिव्हरी फ्लॅटफॉर्मने लगेच तिला उत्तर देत सांगितले की. , “हे वास्तवात अनपेक्षित आहे, हर्षिता. आम्ही समजून घेऊ शकतो की आपणास काय वाटत आहे 🙁 कृपया एक खाजगी संदेश द्वारे तुम्ही तुमचा नोंदणीकृत संपर्क नंबर/ऑर्डर आयडी देऊन आम्हाला मदत करू शकता का? आम्ही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करू)