चांद्रयान २ मोहीमेअंतर्गत विक्रम लँडरला यशस्वीपणे चंद्राच्या भूपृष्ठावर उतरवण्यास भारताला अपयश आले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवन यांनीच विक्रम लँडरशी संपर्क तुटला असून डेटा गोळा केला जात आहे, अशी माहिती रविवारी दिली. चांद्रयान २ मधील विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून आघाती अवतरणानंतर ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर कोसळले असले तरी, त्याचे तुकडे झालेले नाहीत, ते सुस्थितीत आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी स्पष्ट केले. लँडरचे तुकडे झालेले नाहीत, तर ते सुस्थितीत आहे. ते थोडे कललेल्या अवस्थेत आहे, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी सोमावारी सांगितले. विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे ‘इस्रो’चे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश आले तर नेमके काय घडले हे समजू शकेल. इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (इस्ट्रॅक)च्या टीमने या अवतरणात नेमके काय चुकले असावे याचा शोध सुरू केला आहे. देशभरामधून विक्रम लँडरचा चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटरशी संपर्क व्हावा यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. असं असतानाच चांद्रयानसंदर्भात अभिनेत्री दिशा पटानीने केलेले एक ट्विट त्या ट्विटवरील रिप्लायमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विक्रम लँडरला चंद्रावर उतरवण्यात अपयश आल्यानंतर देशभरातील नागरिक इस्त्रोच्या पाठीशी उभे राहिलेले दिसले. अगदी सामान्यांपासून ते बड्या व्यक्तींनीही इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना धीर देणारे ट्विट केले. आम्हाला इस्त्रोचा आणि तेथे काम करणाऱ्या प्रत्येक शास्त्रज्ञाचा अभिमान असल्याचे ट्विटस अनेक क्रिकेपटू, नेते, अभिनेत्यांनी केले होते. यामध्येच अभिनेत्री दिशा पटानीनेही ट्विट करुन चांद्रयान मोहीमेतील सर्व सहभागी शास्त्रज्ञांचा अभिमान आहे असं ट्विट केलं. ‘चांद्रयान २ मोहीमेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचा आम्हाला अभिमान वाटतो. इस्त्रोचे विशेष धन्यवाद. तुमच्या प्रयत्नांमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. जय हिंद,’ असे ट्विट दिशाने केले होते.

मात्र तिच्या या ट्विटला तिच्या एका चाहत्याने दिलेला मजेदार रिप्लाय या ट्विट इतकाच रिट्विट झाल्याचे पहायला मिळाले. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने त्याबद्दल कोणतीची ठोस माहिती हाती येत नसल्याने या चाहत्याने ‘विक्रम लँडर तुज्या नावासारखेच वागत आहे,’ असे उत्तर दिशाचे ट्विट रिट्विट करताना कोट करुन दिले. विक्रम लँडरचा संपूर्ण तुटल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना ते कोणत्या दिशेला आणि कशा पद्धतीने पडले आहे याचा काहीच अंदाज येत नसल्याचे या चाहत्याला या कमेंटमधून म्हणायचे होते. विक्रम लँडरलाही त्याची दिशा ठाऊक नाही असं या चाहत्याला सुचवायचं होतं.

दरम्यान, एकीकडे संपूर्ण देश लँडरशी संपर्क होण्यासाठी प्रार्थना करत असतानाच हा संपर्क होणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. चंद्रावर आधीच लँडरचे अवतरण झाले आहे. आता त्याला फिरवू शकत नाही. त्याचे अँटेना भूकेंद्राच्या दिशेने नाहीत किंवा ऑर्बिटरच्या दिशेलाही नाहीत, त्यामुळे त्याच्याशी संपर्क होणे कठीण आहे. पण अँटेना वळवता आले तर संपर्क शक्य आहे. लँडरवर सौर बॅटरी आहेत, त्या फारसा वापरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे विजेचा प्रश्न नाही. तरीही हे सर्व अवघड आहे, असे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha patani got troll as vikram lander lost its direction hilarious tweet on chandrayaan 2 goes viral scsg