आई आणि मुलांचं नातं हे सर्वात वेगळं आणि आपुलकीचं मानलं जातं. निस्वार्थी प्रेम म्हणून या नात्याकडे पाहिले जाते. मुलांना काही दुखलं खुपलं तरी सर्वात आधी धावत येणारी आई असते. अडचणीच्या वेळी आपला जीव धोक्यात घालून मुलांना वाचवणारी आई असते. पोटच्या मुलांसाठी ती कोणताही धोका पत्करायला तयार असते. पण, रागाच्या भरात ही आई आपल्या मुलीच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एक निर्दयी आई आपल्या पोटच्या मुलीला इतक्या अमानुषपणे मारहाण करते की पाहताना आपला जीव कळवतोय. आईने आधी पलीत्याने चोपले, तिचा गळा पकडून आवळला; यामुळे चिमुकली रडत ओरडत होती, तरी निर्दयी आईच्या दगड मनाला काही पाझर फुटला नाही. या घटनेचा व्हिडीओ पाहून आता अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा