उत्तर प्रदेशातील बांदा येथील तिहेरी तलाकचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेचा हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी भयंकर छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर महिलेच्या कुटुंबीयांनी हुंडा दिला नाही म्हणून नवऱ्याने तिला घटस्फोट देत दुसरं लग्न करत आपल्या पहिल्या पत्नीला घरातून बाहेर काढलं आहे. पीडित महिलेने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली असून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पैलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महवरा गावातील आहे. येथील पीडित महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं, “१६ डिसेंबर २०१७ रोजी तिचा मुस्लीम रितीरिवाजांनुसार विवाह झाला होता, लग्नानंतर पती आणि सासरचे लोक हुंड्यात बाईक, फ्रिज इत्यादी गोष्टींची मागणी करत होते, शिवाय या वस्तू न दिल्याने त्यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली.” शिवाय सासरच्या मंडळीनी तिला मारहाण करून घरातून बाहेर काढल्याचा आरोपही पीडित महिलेने केला.

हेही पाहा- मुलीने सांगितलेलं काम केलं नाही म्हणून रागवले वडील, भावनिक स्टेटस टाकत व्यक्त केलं दु:ख; Viral पोस्टची Swiggy कडून दखल

नवऱ्याने घरातून हकलवून दिल्यापासून ती तिच्या माहेरी राहत आहे.दरम्यान, या महिलेच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी या प्रकरणाबाबत विचारणा केली पण त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी नवऱ्याने तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि तीन वेळा तलाक म्हणून तिला घरातून बाहेर काढले. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीला मारहाण करुन घटस्फोट देणाऱ्या पतीने फतेहपूर येथील एका मुलीशी लग्न केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. याबाबत तिने एसपीकडे लेखी तक्रार करून सासरच्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही पाहा- ट्रॅफिकमुळे तरुणीला ऑफिसला पोहोचायला झाला उशीर; धावत्या स्कूटीवर सुरू केला लॅपटॉप अन्…

सध्या, एसपी अभिनंदन यांच्या आदेशानुसार, हुंडा कायदा आणि मुस्लिम विवाह संरक्षण या कलमांखाली पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध पैलानी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेशन प्रभारी या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर देखील सुरु असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Story img Loader