काही दिवसांमध्ये आता संपूर्ण देशात दिवाळी हा सण साजरा केला जाईल. हा सण सुख-समृद्धी, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. यावेळी आपल्या खाण्यापिण्याची चांगलीच चंगळ असते. मुलांना तर हा सण खूपच जास्त आवडतो. याचं कारण म्हणजे दिवाळीला त्यांना भरपूर फटाके फोडायला मिळतात. फटाके आणि दिवाळी यांचं एक वेगळंच समीकरण आहे. दिवाळीला फटाके वाजवले नाहीत तर दिवाळी साजरी केल्यासारखी वाटत नाही. म्हणूनच लोक दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर अभ्यंगस्नान करून मैदानात फटाके फोडायला जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीमध्ये लोक फटाके फोडण्यासाठी खूपच उत्साही असतात. मात्र, याउलट काही लोक फटक्यांना फारच घाबरतात. फटक्यांमुळे आपण भाजले जाऊ अशी भीती त्यांना असते. अशी लोकं फटाके पेटवत असताना खूपच मजेशीर दिसतात. असाच एक प्रसंग बिहारच्या आमदाराबरोबर घडला आहे. सोनपुर येथील भाजपाचे आमदार विनय कुमार सिंह एका कार्यक्रमाच्यावेळी फटाक्याची वात पेटवल्यावर जोरात पळताना दिसले. मात्र यावेळी ते अचानक खाली पडले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एकीने केस ओढले, तर दुसरीने…;मुंबई लोकलमधील हाणामारीचा आणखी एक Video Viral

विनय सिंह एका फुटबॉल मॅचचे उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. याचदरम्यान ही घटना घडली. ही घटना ३ ऑक्टोबरची आहे. यावेळी मैदानातील लोकांनी विनय सिंह यांचा व्हिडीओ बनवला आणि यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो, विनय सिंह फटक्याची वात पेटवतात आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांचा तोल जातो आणि ते खाली पडतात. यानंतर शेजारी असणारे लोक त्यांना उचलतात. ते जसे पडतात तसा लगेचच फटकाही फुटतो. यामुळे आजूबाजूला दूर पसरतो. हा व्हिडीओ अतिशय मजेशीर असून नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2022 the bjp mla fell on his face while running after burning the wick of the firecracker video viral pvp
Show comments