Diwali 2023: जगभरात यंदा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फराळ, रांगोळी, दिवे आणि सर्वात महत्त्वाचं कंदील. सर्वांच्या घरोघरी एकापेक्षा एक भारी कंदील पाहायला मिळाले. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे कंदील पाहायला मिळतात. हल्ली आपल्याला हवे तसे कंदीलही बनवून मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कलेने सुंदर कंदील घडवतात. दरम्यान असाच एक कोकणातला घरीच बनवलेला कंदील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक कलाकाराचं कौतुक करत आहेत.
कोकणातील एका घराबाहेरील हा कंदील असून कोकणातील तुळस गाव येथील विजय परब यांनी हा अनोखा कंदील बनवला आहे. हा कंदील संपूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. यामध्ये सर्व साहित्य झाडांचं आहे. काठ्या, झावळ्या यांसारखे साहित्य वापरुन हा अनोखा आकाश कंदील बनवला आहे. या कलाकाराची कला पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. बाजारात किती वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षित आकाश कंदील विक्रीसाठी उपल्बध आहेत. मात्र हा कंदील सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. तुम्हीही पाहा या सुंदर आणि अनोख्या आकाश कंदिलाचे फोटो..
पाहा या लिंकवर कंदीलाचे सुंदर फोटो
https://www.facebook.com/share/p/CYCw71nXWTtfJyBt/?mibextid=WC7FNe
हेही वाचा >> VIDEO: अपघात पण काय रोमँटीक झालाय! हा अपघात पाहून तुम्हालाही हसू आवरण होईल कठीण
अनेकांनी या कंदीलाला पसंती दर्शवली आहे. अशाप्रकारे नॅचरल कंदील सर्वांनाच आवडले आहेत. या कंदीलात अतिशय बारकाईनं काम केलेलं आहे. सुरुवातीला हा कंदील घरी हातानं बनवला आहे, असं बिलकुल वाटतं नाहीये, त्यामुळे अनेकांनी या कलाकराच्या कलेला सलाम केला आहे.