सध्या जगभरात जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. फराळानं दिवसाची सुरुवात होते तर फटाके फोडून शेवट. सर्वत्र दिवाळीची झगमगाट पाहायला मिळत आहे. काहींनी दिवे लावून तर काहींनी फटाके फोडून हा सण साजरा केला. दरवर्षी दिवाळीत फटाके फोडले जातात. फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी वाढताना दिसत आहे. या वर्षीही अनेक राज्यांमध्ये फटाक्यांशी संबंधित कडक नियम असूनही लोकांनी फटाके फोडले आहेत. फटाक्यांमुळे प्रदुषण तर होतंच शिवाय अनेकांचा अपघात होण्याचा धोकाही वाढतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात फटाके फोडल्यामुळे कोणाचा तरी जीव धोक्यात आला आहे. यावर्षीही असे काही व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये फटाक्यांमुळे लोकांचा जीव धोक्यात येताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोडवर एक बॉम्ब लावला आहे. दरम्यान, समोरून स्कूटरवरून आलेले तीन जण येऊन स्फोट होत असलेल्या बॉम्बवर पडतात. व्हिडिओमध्ये ते जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहे. समोर पेटते फटाके दिसूनही या तरुणांनी फटाक्यांवरुन गाडी चालवण्याचा प्रयत्न केला मात्र हे त्यांना चांगलंच महागात पडलं.

पाहा व्हिडीओ

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर रॉकेट जाळत असल्याचे दिसत आहे. पण रॉकेट जाळण्याची त्याची पद्धत चुकीची होती. प्रत्येकाला माहित आहे की रॉकेटचे तोंड आकाशाकडे असते. पण या व्यक्तीने रॉकेट जमिनीवर ठेवले. रॉकेट पेटवताच ते समोर उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या लुंगीवर आदळले आणि तिथेच स्फोट होतो.

पाहा व्हिडीओ

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या घराच्या बागेत बसलेली दिसत आहे. तेव्हा अचानक समोरून एक रॉकेट येते आणि त्यावर स्फोट होतो. त्याच्यावर रॉकेटचा स्फोट होताच तो घाबरून उठतो आणि घराच्या आत जातो.

हेही वाचा >> खूर्चीत बसून निवांत फोनवर बोलत होता तरुण; एका चुकीमुळे अचानक फुटला कान, VIDEO पाहून उडेल थरकाप

सोशल मीडियात सध्या हे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @GabbbarSingh या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2023 people lives in trouble due to firecrackers watch these dangerous viral video srk