Diwali Memes 2024 Video : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा ३१ ऑक्टोबर रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जाईल. त्यानिमित्ताने आता प्रत्येक घराघरात साफसफाई, रंगकामाची लगबग सुरू झाली आहे. सुट्टी किंवा वेळ मिळेल तशी साफसफाई केली जात आहे. अनेक जण यंदा दिवाळीसाठी घराच्या सजावटीच्या वस्तूंची खरेदी करण्यात व्यग्र आहेत. याच दिवाळीनिमित्त सुरू असलेली साफसफाईची लगबग पाहता, आता सोशल मीडियावरही त्यासंबंधित मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. त्यातील फोटो आणि कॅप्शन वाचून तुम्हीही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.
दिवाळीपूर्वीची साफसफाई प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतात. काही जण घरातील चमच्या, पेल्यापासून अंथरुणांपर्यंत एकेक गोष्ट चकचकीत करतात; पण काही जण वरच्यावर स्वच्छ करून झाली सफाई, असे म्हणत समाधानी होतात. काही घरांत तर सफाई म्हणजे फार जबाबदारीचे काम असते. पण सफाई म्हटली की, घरातून पळ काढणारे लोकही असतात. त्यामुळे दिवाळीत घरची साफसफाई म्हटली की, अनेकांना हसू येते. त्यावर अनेक घरांत फार विनोददेखील होतात. त्यामुळे सोशल मीडियावर दिवाळीच्या साफसफाईवरून अनेक मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत.
@Gulzar_sahab नावाच्या अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क पंखा काढून, तो मस्तपैकी जमिनीवर ठेवून पाण्याने धुत असल्याचे दिसतेय. साफसफाईच्या नावाखाली त्या महिलेने घरातील पंख्याची पार वाट लावून टाकली आणि त्यामुळे सोशल मीडियावर साफसफाईचा हा विचित्र आणि खर्चीक प्रकार पाहून लोक खूप हसून मजा घेत आहेत.
त्यानंतर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये फोटोंचा एक कोलाज दिसतोय; ज्यामध्ये बंड्यापासून जेठालालपर्यंत सर्व जण साफसफाईमध्ये व्यग्र दिसत आहेत. @RVCJ_FB नावाच्या अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
या व्हायरल व्हिडीओत साफसफाई करताना महिलेच्या वजनामुळे प्लॅटफॉर्म कोसळल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स लोकांना काळजीपूर्वक साफसफाई करण्याचा सल्ला देत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये चुप चुप के या चित्रपटातील बंड्याचा एक सीनचा दिवाळी मीम तयार करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक मालक आपल्या नोकराला ‘एवढी साफसफाई केलीस, तर जास्त मिळेल’, असे म्हणताना दिसत आहे. हा सीन पाहून तुम्हालाही हसायला येईल.
व्हायरल होत असलेल्या या मीममध्ये गोपी बहू दिसत आहे. साथ निभाना साथियां या टीव्ही शोमधील गोपी बहूचा फोटो पोस्ट करताना युजरने लिहिले की, मी- दिवाळीला घालण्यासाठी नवीन कपडे तयार आहेत. आई- पहिले घरचे कपडे घाल; साफसफाई करायची आहे. आईने दिवाळीच्या साफसफाईसाठी हाक मारताना तिने दिलेली रिअॅक्शन एकदन हास्यास्पद आहे.
एक्सवर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये जेठालालच्या कपड्यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. तसेच यातून स्वच्छतेसाठी शॉपिंगची आयडिया देण्यात आली आहे.
व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये केबीसी शोमधील अमिताभ बच्चन यांच्या एका डायलॉगद्वारे मुंग्या आणि पाली यांच्या वेदना वेगळ्या पद्धतीने मांडल्या जात आहेत.
दिवाळीच्या सफाईनंतर होणाऱ्या स्थितीचे वर्णन करणाऱ्या या मीममध्ये पीके या चित्रपटातील आमिर खानचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. अनेक जण या परिस्थितीची तुलना स्वत:शी केली आहे. हा फोटो @Prince8bx नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे.
व्हायरल होत असलेल्या या मीममध्ये झुरळ आणि सरडे यांच्या स्थितीचे वर्णन करण्यात आले आहे; ज्यासाठी ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील मनोज बाजपेयी यांचा एक सीन पोस्ट करण्यात आला आहे
या मीममध्ये घरातील धाकट्या भावाचे वर्चस्व दाखविण्यात आले आहे. त्यासाठी पंचायत-३ वेब सीरिजमधील एक दृश्य दाखविण्यात आले आहे.
दिवाळीच्या स्वच्छतेसंदर्भात शेअर केलेल्या या मीममध्ये चार परिस्थिती दाखविण्यात आल्या आहेत, ज्या लोकांना खूप आवडत आहेत.
सोशल मीडियावर दिवाळीबाबत व्हायरल होणाऱ्या मीम्समधील कोणता मीम्स तुम्हाला जास्त आवडला आम्हाला कमेंट्समध्ये कळवा.