लहान मुलांना कधी काय प्रश्न पडेल सांगता येत नाही. त्यांच्या न संपणाऱ्या असंख्य प्रश्नांमधून त्यांचे नवीन गोष्टींबाबतचे कुतूहल स्पष्ट होते. मोठ्यांना त्यांच्या या निरागस प्रश्नांचे कौतुक वाटते. असाच एक निरागस प्रश्न विचारणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे… वेड्या बहिणीची वेडी ही माया’ हे गाणं प्रत्येक भाऊबीजेला आवर्जुन म्हटलं जात. बहीण भावाच्या नात्यातील गोडवा या गाण्यातून स्पष्ट होतो, पण लहान मुलांना या गाण्यातील शब्दांचा अर्थ कळणे कठीण आहे. असेच काहीसे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये झाले. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली तिच्या भावाला भाऊबीजेनिमित्त ओवाळताना दिसत आहे. तेव्हा तिथे उपस्थित असणारी महिला ‘ओवाळीते भाऊराया..’ हे गाणं गातात. पण त्यातील ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ हे वाक्य ऐकताच या चिमुकलीला प्रश्न पडतो आणि ती लगेच “मला वेडी बोलली?” असा प्रश्न विचारते. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील बिघडलेल्या नळामुळे झाले प्रवाशांचे हाल; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

व्हायरल व्हिडीओ :

या चिमुकलीच्या निरागस प्रश्नाने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. अनेकजण या चिमुकलीच्या स्वॅगचे कौतुक करत आहेत.