Diwali in mumbai local video: असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईचीलोकल आहे. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. मात्र, सणवार आले की मुंबईकर लोकल ट्रेनला एखाद्या घरासारखं रुप येतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. भारताच्या प्रत्येक भागात दिव्यांचा हा सण मोठ्या साजरा केला जात असून हा सण भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुंबई लोकलमध्ये देखील मोठ्या उत्साहानं लोकांनी दिवाळी सेलिब्रेट केली. मुंबईकरांनी लोकलमध्ये कशी दिवाळी साजरी केली तुम्हीही पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल मुंबईकरांचा नाद नाय.

मुंबई लोकल म्हणजे दुसरं घर

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र हीच लोकल ट्रेन अनेकांसाठी दुसरं घर आहे. त्यामुळे आपण घरी जसे सण साजरे करतो तसेच सण मुंबई लोकलमध्येही साजरे केले जातात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेन कोणत्यातरी स्टेशनवर थांबली आहे आणि स्टेशनवर ट्रेनमध्ये अनेक प्रवाशी चढताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पुरुषांच्या डब्यातील असून सगळ्या पुरुषांनी फराळ आणला आहे. सर्व प्रवासी एकत्र जमून दिवाळीचा फराळ आणि काही खावू एका प्लेटमध्ये भरत अनेकांना देत आहे. व्हिडिओच्या शेवटी समजते की सर्व लोकल ट्रेनमध्ये जमेल तशी दिवाळी साजरी करत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणून जास्त हवेत जायचं नाही” मगरीच्या नादाला लागणं अजगराला महागात पडलं; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ”@borivali_churchgate_bhajan” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत कॅप्शनमध्ये,”मुंबई लोकल ट्रेन मधील दिवाळी…” असे लिहिण्यात आलेले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali celebrate in mumbai local video goes viral on social media diwali 2024 srk