दिवाळी म्हटलं की फक्त दिव्यांची रोषणाई किंवा फटाके सर्वांना आठवतात. पण त्याचबरोबर दिवाळीचा फराळ देखील तितकाच महत्त्वाचा असतो. चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, करंजी, चिवडा असे विविध फराळाचे पदार्थ दिवाळीत आवर्जून केले जातात. दिवाळीत फराळ करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळींना आवर्जून बोलवले जाते. दिवाळीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ताव मारतात अन् नंतर वजन वाढल्याची तक्रार करतात. अशाच उत्साही खाद्यप्रेमींना एका तरुणाने मोलाचा सल्ला दिला आहे. भररस्त्यात हातात पोस्टर घेऊन फिरणाऱ्या तरुणाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक तरुण हातात पोस्ट घेऊ फिरताना दिसत आहे ज्यावर लिहिले आहे की, तुम्ही गोड आहातच! पण दिवाळीतील लाडू तुमच्यापेक्षा गोड आहेत, वजन वाढल्यास आम्ही जबाबदार नाही…” – एक फिटनेस कोच”

हेही वाचा –“तुमची आई देखील असंच करते का?” फ्रिज आणि प्रत्येक मराठमोळ्या आईची गोष्ट, Viral Video एकदा बघाच

u

i

हा फोटो इंस्टाग्रामवर science_based_fitnessclub नावाच्या पेजवर शेअर केला आहे, व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मग घेताय ना जबाबदारी!”

हेही वाचा –“मुलांनी तर हद्द केली राव!” वर्गात शिक्षक शिकवत होते अन् मागच्या बाकावर बसून विद्यार्थी करत होते ‘हे’ काम, Video Viral

दिवाळीच्या फराळावर ताव मारणाऱ्या खाद्यप्रेमी आणि फिटनेस प्रेमींना हा फिटनेस कोच मोलाचा सल्ला देत आहे. दिवाळीचा फराळ करताना वजन वाढणार नाही याची काळजी घ्या हेच सांगण्याचा प्रयत्न तो करत आहे.

पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने गंमतीने म्हटले, “मग तिखट चकल्या खाल्या तर चालतील का?”

दुसऱ्याने लिहिले की,” आता करता करता तो गोड झालाय की नाही हे कसं कळणारं भावा..मग असं करत करत २, ४ जातात की पोटात..”

तिसरा म्हणाला की, “सर दिवाळी आहे थोडी चिटींग चालेल.”

एकाने मजेत टोला लगावला आणि म्हणाला की, “लाडू विकणारे शोधत आहेत तुम्हाला..”