वसतिगृह(हॉस्टेल) एक अशी जागा आहे जिथे मुले त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण घालवतात. वास्तविक ही मुलं घरापासून दूर असलेल्या वसतिगृहात एकटेच राहतता. पण इथे भेटणारे लोक त्यांना आयुष्य कसे जगायचे हे शिकवते. मित्रांसह मौजमजेपासून ते भांडण आणि अनेक गोड-आंबट आठवणी, मुलांना या वसतिगृहामध्ये अनुभवता येतो. अनेक वेळा वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना सणासुदीत त्यांच्या घरीही जाता येत नाही. अशा परिस्थितीत ते वसतिगृहातच आपल्या कॉलेज किंवा शाळेतील कुटुंबांसह सण साजरे करतात. सध्या असाच एका हॉस्टेलमधील व्हिडिओ चर्चेत आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने वसतिगृहात राहणारी काही मुले घरी न गेल्याने त्यांना दिवाळी साजरी करण्याचा धोकादायक मार्ग निवडला आहे. व्हिडीओमध्ये दिसते कि विद्यार्थ्यांनी वसतिगृह परिसरालाच युद्धभूमी बनवून युद्ध सुरु केले आहे. या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा