Fake Parcel Delivery Scam:  अनेकजण दिवाळीनिमित्त मोठ्याप्रमाणात ऑनलाईन शॉपिंग करतात, अगदी घरातील टूथब्रशपासून ते मीठापर्यंत अनेक गोष्टी ऑनलाईन ऑर्डर केल्या जात आहेत. पण या ऑनलाईन शॉपिंगचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेतच. ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला अनेकदा खूप महागात पडू शकते. ऑनलाईन शॉपिंग जरी सोपी असली तरी यातून फसवणूक करणाऱ्यांचीही कमी नाही. तुम्ही एखाद्या वेबसाईटवरुन ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर त्या कंपनीचा डिलिव्हरी तुमची ऑर्डर केलेली वस्तू घेऊ तुमच्या घरी येतो. तुम्ही दिलेल्या लोकशनजवळ पोहचल्यानंतर तो डिलिव्हरी बॉय तुम्हाला कॉल करतो. पण याच कॉलच्या माध्यमातून आता फसवणूक केली जात असल्याचे एक प्रकरण सध्या समोर आले आहे. या कॉ़लच्या माध्यमातून हॅकर्स तुमच्या बँक अकाउंटमधील पैसे काही क्षणात गायब करत आहेत. या नव्या ऑनलाईन स्कॅमचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यातून एक महिला या नव्या पार्सल स्कॅमपासून सावध राहण्याचा सल्ला देत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला ऑनलाईन पार्सलसंदर्भात एका व्यक्तीशी कॉलवर बोलत आहे. हा व्यक्ती त्या महिलेला सांगतोय की, तुम्हाला डिलिव्हरी बॉयला कॉल करण्यापूर्वी त्याच्या नंबरपुढे काही कोड टाकावा लागेल. यावर महिला म्हणते, ठीक आहे… डिलिव्हरी बॉयचा नंबर डायल करण्यापूर्वी मी 401 डायल करुन नंतर डिलिव्हरी बॉयचा नंबर डायल करते. यानंतर ती महिला सांगतेय की, या नवीन स्कॅममध्ये स्कॅमर तुम्हाला सांगतो की, डिलिव्हरी पार्टनर तुमचे पार्सल पोहोचवण्यासाठी तुमचे घर शोधत आहे पण त्याला ते सापडत नाही. त्यामुळे तो तुम्हाला डिलिव्हरी बॉयचा नंबर देईल आणि म्हणेल की या नंबरच्या आधी तुम्हाला 401 डायल करावा लागेल आणि त्यानंतर डिलिव्हरी पार्टनरचा नंबर डायल करावा लागेल.. अशाप्रकारे ऑनलाईन शॉपिंगदरम्यान लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही देखील जरा सावध रहा.

ऑनलाईन स्कॅमचा हा व्हिडिओ @Atheist_Krishna नावाच्या ट्विटर युजरने पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की,- सावध राहा आणि सतर्क रहा… मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने लिहिले की. स्कॅमर्सनी आता आपला अधिक डोकं वापरण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी ओटीपी आणि मेसेज फॉरवर्ड करता येत नसल्याची माहिती दिली. काही म्हटले की, त्यांनाही असे कॉल आले होते, मात्र त्यांनी ते लगेचच डिस्कनेक्ट केले होते. बाय द वे, तुमच्यासोबत असं कधी अशी फसवणूक झाली आहे का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali online shopping how fake parcel delivery scam works woman explain in viral video sjr