दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. दिवाळी जवळ आली की साफसफाई करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी लगबग सुरू असते. एखादा सुट्टीचा दिवस मिळाला की घरातले प्रत्येक जण साफसफाई करण्याची जणू मोहीमच हातात घेतात. पण, यात स्त्रियांचा हात धरणं जरा अवघडच आहे.

आपल्या घराचा कोपरा न कोपरा साफ असावा हे घरातल्या करत्या स्त्रीला नेहमी वाटत असतं आणि खास करून दिवाळीला घर टाप-टीपच असावं असा तिचा हट्ट असतो. पण, कधीकधी अशी साफसफाई जीवघेणीदेखील ठरू शकते. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ही महिला किचनच्या कठड्यावर उभी राहून साफ सफाई करताना दिसतेय. पण साफ सफाई करतानाच या महिलेबाबत एक धक्कादायक घटना घडते.

हेही वाचा…. बिचाऱ्याची काय चूक? स्कूटी चालवताना थेट पेट्रोल पंपावरच धडकली अन्…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक महिला साफसफाई करताना दिसत आहे. अगदी बेसिनवर उभं राहून ती किचन चकाचक करताना दिसत आहे. साफ सफाई करण्याच्या नादात या महिलेबरोबर एक धक्कादायक घटनाच घडली. सफाई करता करता बेसिनचा कठडा कोसळते आणि महिला थेट बेसिनसह खाली कोसळेते.

हा व्हिडीओ @5secgyan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “दिवाळी जवळ येतेय तर विचार केला थोडी सफाई करू” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर या व्हिडीओला तब्बल ३६. १ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… VIDEO: भरजत्रेत कपलचा रोमान्स, आकाशपाळण्यात केलं किस अन्…., बेभान जोडप्याने हद्द केली पार

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओने सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेकांनी या साफसफाईच्या जीवघेण्या कृतीवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.  व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे मजेशीर नाहीय, यादरम्यान तिला खूप दुखापत झाली असणार.” तर दुसऱ्याने “काकींचा दोष नाही, ज्यांनी बेसिनचं काम केलं त्यांचा दोष आहे.” तर एकजण कमेंट करत म्हणाला, बघा झाला की नाही किचन साफ असं मजेशीररित्या म्हणत एकाने कमेंट केली आहे.

हेही वाचा… कॉलेजमध्येच मृत्यूने गाठलं! स्टेजवर डान्स करताना तरुणीने सोडले प्राण, नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO

दरम्यान, याआधीही अशी साफसफाई करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात ती महिला इमारतीच्या खिडकीबाहेर उभी राहून साफसफाई करतेय.