Lakshmi Puja 2024 Wishes : दिवाळी हा पाच दिवसांचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पाच दिवशी घरोघरी दिवे लावले जातात. अंगणात रांगोळी काढली जाते. गोडधोड तयार केले जाते. फटाके फोडले जातात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. या पाच दिवसामधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवसाला दिवाळी सुद्धा म्हणतात. या दिवशी नवीन कपडे परिधान करून लक्ष्मीची पूजा केली जाते. आप्तस्वकीयांना, प्रियजनांना शुभेच्छा दिल्या जातात. आज आपण काही हटके शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. हे दिवाळीचे शुभेच्छा संदेश तुम्ही व्हॉट्सअप्स, मेसेज, स्टेटस, फेसबूक द्वारे तुमच्या जवळच्या मित्र मैत्रीणी तसेच नातेवाईकांना पाठवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरात लक्ष्मीचा निवास
अंगणी दिव्यांची आरास
मनाचा वाढवी उल्हास
दिवाळी अशी खास
शुभ दिपावली

जुने जुने विसरून सारे
फक्त आनंद वाटण्याचा
पर्यावरणाशी एकरुप होऊन
सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा
उत्सव प्रकाशाचा अवतरला
तेजस्वी सण दिवाळीचा
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

समृद्धी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
भाग्याचा सूर्योदय झाला
वर्षा झाली हर्षाची
इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची

हेही वाचा : Diwali Lakshmi Puja 2024 : ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर? तुमच्या शहरानुसार जाणून घ्या, लक्ष्मीपूजनाची योग्य तारीख अन् मुहूर्त

स्नेहाचा सुंगध दरवळला
आनंदाचा सण आला
एकच मागणे दिवाळी सणाला
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली
गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली
आनंदाची उधळण करीत
आली दिवाळी आली..
दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे!
चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो,
लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

हेही वाचा : Pune Video : पुण्यातील दगडूशेठ मंदिरात आकर्षक दिवाळी सजावट, व्हिडीओ एकदा पाहाच

दिवाळीत दारी दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख समृध्दी नांदू दे.
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

मराठमोळी संस्कृती आपली,
मराठमोळा आपला बाणा,
मराठमोळी माणसे आपण,
मराठमोळी आपली माती,
अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती,
शुभ दिपावली…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राचा कंदील घरावरी
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शुभ दीपावली…

हेही वाचा : Jaya Kishori : दोन लाखांची बॅग वापरल्याने जया किशोरी ट्रोल, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, “मी संत नाही, मला…”

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही दिशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष्मीपूजन का करतात?

अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. पण तु्म्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे.
लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते.याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali wishes 2024 wishes in marathi lakshmi puja messages greetings quotes sms ndj