Shocking video: सध्या दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येकालाच माझ्याजवळ सोन्याचे दागिने असावेत असे वाटते. मात्र शुद्ध सोन्याच्या नावाखाली अनेकदा फसवणूक होते. अनेकजण शुद्ध सोन्याच्या नावाखाली कमी दर्जाच्या सोन्याचे दागिने विकतात. हॉलमार्क असलेला दागिना हा खऱ्या सोन्यापासून तयार केलेला आहे, असे समजले जाते. मात्र आजकाल बनावट हॉलमार्क असलेले दागिने विकले जात असल्याचीही प्रकरणं समोर आली आहेत.
अनेकदा तर सराफ सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्सचही अमिष दाखवतात. यामध्ये कधी गिफ्ट्स असतात तर कधी सोन्याची १ ग्रॅम, २ ग्रॅम, ५ ग्रॅम सोन्याची नाणी दिली जातात. पण विचार करण्याची गोष्ट म्हणजे ज्वेलर्सकडून जी सोन्याची नाणी गिफ्टमध्ये मिळतात ती खरंच सोन्याची असतात का? याचाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की, ज्वेलर्स ग्राहकांची कशाप्रकारे फसवणूक करतात.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीच्या हातात एका ज्वेलरकडून मिळालेलं गोल्ड कॉईनचं गिफ्ट कार्ड आहे. हा व्यक्ती ते गिफ्ट कार्ड कापतो आणि त्यामधील नाणं खरं आहे का ते तपासून पाहातो. अन् काय आश्चर्य कार्डमधून ते नाणं बाहेर काढताच त्याला धक्काच बसतो. कारण ते नाणं नसून चक्क सोनेरी रंगाचा स्टिकर आहे. म्हणजे ज्या कुठल्या ज्वेलरनं फ्री गिफ्टच्या नावाखाली हे नाण दिलं आहे त्यानं केवळ अमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे तु्म्हीही इथून पुढे सोन्याची नाणी खरेदी करताना ते तापासून घ्या आणि कोणत्याही गिफ्टच्या मोहाला बळी पडू नका.
पाहा व्हिडीओ
हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची खरेदी करा
सर्वात महत्वाचे म्हणजे हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचीच तुम्ही खरेदी करा. BIS हॉलमार्क दागिने सोन्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करताना या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे.
सोन्याचे वजन तपासने गरजेचं
सोने खरेदी करताना त्याचे वजन तपासने खूप गरजेचे असते. वजनामधील किंचित चढ-उतारही समस्या निर्माण करू शकते. सोने खरेदी तुम्हाला महागात पडू शकते
सोन्याची शुद्धता तपासून घेणं महत्वाचं
सोन्याची खरेदी करताना सोन्याची शुद्धता महत्वाची असते. सोन्याची शुद्धता तपासून घ्यावी. २४ कॅरेट सोनं म्हणजेच ९९९ अंकित सोने सर्वात शुद्ध असते. तुम्ही सोन्याचे दागिने सामान्यतः १८ ते २२ कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यामध्ये इतर धातूही मिश्रित असतात. तर २४ कॅरेट सोन्याचे दागिने न बनवता सोन्याच्या नाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. दागिने तयार करण्यासाठी २२ कॅरेटचे सोने वापरले जाते.