देशातील करोनामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता अनलॉकनंतर अनेकजण नोकरी शोधण्यासाठी शहरांकडे वळू लागले आहेत. मात्र याच बेरोजगारीच्या संकटाचा फायदा घेऊन काही जण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती चोरुन त्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आलेत. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून सोशल मिडियावरील अफवांचे प्रमाणही वाढलं आहे. पोलिसांपासून सरकारी यंत्रणांपर्यंत आणि नोकरीपासून ते घर बसल्या पैसे कमवण्याच्या जाहिरातींपर्यंत अनेक विषयांसदर्भातील अफवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात आहे. अशीच एक अफवा सध्या चर्चेत आहे ती म्हणजे घरबसल्या मोबाईलचा वापर करुन दिवसाला काही हजार कमवा. मात्र अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
WhatsApp वर येणाऱ्या ‘या’ लिंकवर क्लिक करू नका; मुंबई सायबर पोलिसांचं आवाहन
मागील काही दिवसांपासून हा मेसेज व्हायरल होत आहे
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-12-2020 at 16:00 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not click on suspicious links says rashmi karandikar dcp cyber crime scsg