Viral Video : पती पत्नी हे अतिशय पवित्र नातं आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येत नव्या आयुष्याची सुरुवात करतात. एकमेकांना समजून घेत, एकमेकांना सहकार्य करत आयुष्य जगतात. हे नातं प्रेम आणि विश्वासावर टिकतं. या नात्यात प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. अनेकदा महिला प्रेमाने त्यांच्या नवऱ्याला अहो सुद्धा म्हणतात. तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याला किंवा होणाऱ्या नवऱ्याला अहो म्हणता का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी अहो ला जपानी भाषेत काय म्हणतात, याविषयी सांगते. तरुणीने सांगितलेला अहो चा अर्थ ऐकून तुम्हीही अहो म्हणणे कदाचित बंद कराल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Do you call your husband Aho : Japanese meaning for ‘Aho’ Leaves Girl in Splits Watch Funny Video)

काय सांगते तरुणी?

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी सांगते, “मंडळी भाषेची गम्मत सांगते तुम्हाला. आपल्याकडे आपण आपल्या नवऱ्याला किंवा होणाऱ्या नवऱ्याला आदरयुक्त शब्द आहे अहो किंवा कुणालाही आपण अहो जाहो करतो. विशेषत: नवऱ्याला कशी हाक मारतो, अहो म्हणून.. आणि अहो ला जपानी भाषेत सर्च केले तर अहोला जपानी भाषेत अर्थ आहे मूर्ख (Idiot).”

हेही वाचा : ‘वाघ गुर्रS गुर्रSS करतोय अन् रक्त पितोय…’ जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्याने गावरान भाषेत सांगितला किस्सा; VIDEO पाहून हसाल पोट धरून

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Baba Vanga Predictions 2025 : वर्ष २०२५पासून सुरू होईल विनाश! ही भविष्यवाणी ऐकून उडेल काळजाचा थरकाप, जगावर येईल का मोठं संकट?

kavi_gomase’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अहो !!!!!!!!!! चा जपानी अर्थ” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे चुकीच आहे अध्यक्ष महोदय .” तर एका युजरने लिहिलेय, “मी आजपासून नवऱ्याला नावाने हाक नाही मारणार तर अहो म्हणणार” आणखी एका युजरने लिहिलेय, “आता कोणी अहो म्हणत नाही डायरेक्ट नवऱ्याचं नाव घेतात” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader