Viral Video : शाळा हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शाळेच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. लहानपणी शाळेची किंमत कळत नाही पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शाळा आणि शाळेच्या आठवणी कायम लक्षात राहतात. शाळा, शाळेतील मित्र आणि शिक्षक, शाळेतील शिक्षण आणि न विसरणाऱ्या अशा कितीतरी शाळेच्या आठवणी घर करुन कायम मनात राहतात.
सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा शाळेची आठवण येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील खिचडी वाटप सुरू आहेत. तुम्ही कधी शाळेतील खिचडी खाल्ली आहे का? जर हो तर हा व्हिडीओ पाहून तुमच्या शाळेतील आठवणी पुन्हा ताज्या होतील.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण खिचडी शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करताना दिसत आहे. विद्यार्थी शिस्तीने रांगेत उभे राहून खिचडी घेताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत दिसेल की विद्यार्थ्यांना केळीसुद्धा वाटप केली जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण येऊ शकते. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “ही खिचडी खाण्यात जो स्वाद, आनंद होता… तो आनंद कुठल्याही फाइव्ह स्टार मध्ये कितीही पैसे देऊन मिळणार नाही. तुम्ही कधी शाळेतील खिचडी खाल्ली आहे का? या खिचडीला एक वेगळीच चव असते.
हेही वाचा : Pune : पुण्याच्या फळे विक्रेत्याची ही अनोखी स्टाइल एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
हेही वाचा : VIDEO : आवड जपताना वय कधीही आडवे येत नाही! मराठमोळी आजी करतेय फोटोग्राफी; व्हिडीओ होतोय व्हायरल
creative_beats_90 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कितीही किंमत मोजली तरी हे दिवस परत कधीही येत नाहीत..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ बघून शाळेची आठवण आली. ते पण काय दिवस होते” तर एका युजरने लिहिलेय, “गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आलं आणि शाळेतल्या आठवणींना व्हिडीओ उजाळा देऊन गेला. खरंच काय दिवस होते. सगळं काही ठिक होते तेव्हा..”