Viral Video : इडली हा दक्षिण भारतातील पदार्थ असला तरी भारतामध्ये सर्वश्रुत आहे. भारतातील कोणत्याही राज्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे इडली होय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने इडली खातात. सकाळचा नाश्ता असो की जेवण अनेकांना इडली खायला आवडते. तुम्हाला इडली आवडते का? तुम्ही घरी किंवा हॉटेलमध्ये इडली खाल्ली असेल पण तुम्ही कधी गावाकडली इडली खाल्ली आहे का? तुम्हाला माहिती आहे, गावाकडे इडली कशी बनवी जाते? आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गावातील अनोख्या पद्धतीने इडली बनवताना दिसत आहे. त्यांची इडली बनवण्याची अनोखी स्टाइल पाहून तुम्हीही थक्क व्हाल. चुलीवरची इडली बनवताना पाहून अनेकांना त्यांच्या गावाची आठवणसुद्धा येऊ शकते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण हा व्हिडीओ पाहून इडली आवडणाऱ्यांना पाहून गावाकडली ही इडली खावीशी वाटेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला इडली पात्रावर हाताने इडली टाकत आहे. हातावरची ही इडली कदाचित तुम्ही पहिल्यांदा पाहात असाल आणि या महिलेचा इडली टाकतानाचा योग्य अंदाज पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.विशेष म्हणजे त्या चुलीवर इडली बनवत आहे. चुलीवरच्या कोणत्याही पदार्थाची चव ही अप्रतिम वाटते. या इडलीची चव खूप अप्रतिम असेल यात काही शंका नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा ही इडली नक्कीच स्वादिष्ट असावी” तर एका युजरने लिहिलेय, “हातापासून बनवलेली इडली” आणखी एका युजरने लिहिलेय, “सूपर अम्मा”
chennaifooddiary या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गावातील इडली” या अकाउंटवरुन विविध पदार्थांचे व्हिडीओ बनवले जातात. अश्विन कुमार या तरुणाचे हे अकाउंट आहे. प्रत्येक व्हिडीओवर युजर्स भरभरुन लाइक्स आणि कमेंट्स करत असतात.