Viral Video : नारळ पाणी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे नारळाला नैसर्गित सपोर्ट्स ड्रिंक सुद्धा म्हणतात. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास नारळ पाणी मदत करते.

चविष्ठ आणि थंड नारळ पाणी पिणे अनेकांना आवडते पण तुम्ही कधी गरम नारळ पाणी प्यायला आहात का? तुम्हाला वाटेल गरम नारळ पाणी कसे बनवतात? आज आपण जाणून घेऊ या. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चुलीवरचे नारळ पाणी कसे बनवायचे, याविषयी सांगितले आहेत. (do you ever drink coconut water on Chulha hot coconut water video goes viral on social media)

young reel maker fell on the waterfall
‘भावा, जीव गेला की तो परत येत नाही…’ धबधब्यावर रील बनवणाऱ्या तरुणाचा पाय घसरला; पुढे जे घडलं VIDEO पाहून अंगावर येईल काटा
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Dr Ajit Ranade stated that each person needs 180 eggs and 12 kg of meat annually
वैज्ञानिक सांगतात, प्रत्येकाने वर्षाला १८० अंडी आणि १२ किलो मांसाहार खाण्याची गरज, काय आहे कारण बघा
Shocking A large tank of water fell on the woman's head from the terrace video
भयंकर! रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेच्या डोक्यात टेरेसवरुन पडली पाण्याची टाकी; VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?
sago barfi for fasting
उपवासासाठी खास साबुदाण्याची बर्फी; एकदम सोपी रेसिपी
Rice & Weight Gain : how to eat rice the right way
Rice & Weight Gain : असा खा भात, वजन अजिबात वाढणार नाही, भात खाण्याची योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO
sabudana khichdi recipe in marathi
साबुदाणा न भिजवता फक्त काही मिनिटांत झटपट बनवा साबुदाण्याची खिचडी; एकदम सोपी रेसिपी
what happens to the body if you drink saunf-ajwain water every day
रोज बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

चुलीवरचे नारळ पाणी कधी प्यायला का? (hot coconut water)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. व्हिडीओमध्ये हा तरुण १५ -२० नारळ चुलीवर भाजताना दिसतो. त्यानंतर बाहेरून काळा पडलेला एक नारळ तो आगीतून बाहेर काढतो आणि मग तो हे नारळ सोलतो आणि फोडतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नारळाच्या आतील पाणी खूप गरम आहे. त्यानंतर हा तरुण या नारळाबरोबर स्ट्रॉ आणि चमचा देत ग्राहकाला सर्व्ह करतो. असे गरम नारळ पाणी तयार केले जाते. कदाचित गरम नारळ पाणी हे तुम्ही पहिल्यांदा पाहिले असेल. सध्या या चुलीवरच्या नारळ पाणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “पोलिस हवे तर मुंबई पोलिसांसारखे…” स्वातंत्र्यदिनानिमित्त खाकी स्टुडिओ म्युझिक बँडने केले देशभक्तिपर गाण्यांचे सादरीकरण; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : स्कॉर्पिओचं नियंत्रण सुटलं अन् ४ सेकंदातच भयानक घडलं, नेमकं कुठे चुकलं तुम्हीच सांगा; अपघाताचा Live VIDEO व्हायरल

agri_diploma_katta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चुलीवरचं नारळ पाणी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीर लिहिलेय, “थंड पाणी पाहिजे असत पण हे तर खोबरेल तेल प्यायला लावतोय.” तर एका युजरने लिहिलेय, “अरे भाई त्यात जरा चहा पावडर आणि दूध पण टाक” आणखी एका युजरने लिहिलेय, “चुलीवरच आईस्क्रीम ट्राय कर” अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर असे अनेक विचित्र रेसिपीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.