Pune Video : नुकतीच कोजागिरी पौर्णिमा पार पडली. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा सुद्धा म्हणतात. कोजागिरीच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे चंद्राचे गोड असे रूप पाहायला मिळते. या दिवशी चंद्राचा प्रकाश रोजच्या प्रकाशापेक्षा जास्त असतो. चंद्राच्या या प्रकाशाचे प्रतीक म्हणून दुधाचे प्राशन केले जाते. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध तापवले जातात आणि या दुधाचे सेवन केले जाते. अनेक ठिकाणी या दिवशी रात्री लोक गाणी डान्सचा कार्यक्रम आयोजित करतात.

१६ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. तुम्ही या दिवशी मसाला दूध प्यायला का? जर नाही तर टेन्शन घेऊ नका कारण आज आम्ही तुम्हाला एका अशा ठिकाणाविषयी सांगणार आहोत जिथे फक्त कोजागिरीच्या दिवशी नाही तर वर्षभर मसाला दूध मिळते. येथील दूध इतके लोकप्रिय आहे की दररोज लोक हे मसाला दूध प्यायला गर्दी करतात. या ठिकाणचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक

हेही वाचा : ‘लाडक्या बहिणीचे अन् निराधार योजनेचे पैसे एकाच वेळी आले’ आनंदानं आजी थेट डीजेवर थिरकल्या; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक स्टॉल दिसेल या. स्टॉलवर दोन विक्रेते कढईमध्ये मसाला दूध बनवताना दिसत आहे. येथील मसाला दूध प्यायला अनेक जण गर्दी करत आहे. सहसा अनेक जण फक्त कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पितात पण या ठिकाणी तुम्हाला वर्षभर मसाला दूध मिळेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मसाला दूधचा स्टॉल नेमका कुठे आहे? तर हा स्टॉल भारती विद्यापीठाजवळ आहे. या स्टॉल चे नाव माऊली मसाला दूध असून हा स्टॉल रात्री १२ पर्यंत सुरू असतो. MH12 पावभाजी जवळ , भारती विद्यापीठाच्या बॅक गेटजवळ तुम्हाला हा स्टॉल दिसेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “कोजागिरी असो की नसो, वर्षभर येथे असते मसाला दूध प्यायला गर्दी”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : उद्यापासून सूर्याचा जबरदस्त प्रभाव; राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा

pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मसाला दूधसाठी पुण्यातला भारी स्पॉट..तुम्हाला माहिती का??”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप जास्त भारी असतं दूध. नियमित एक ग्लास. दादा पण खूप चांगला आहे. सर्वांशी आदराने बोलतो. नक्कीच भेट द्या.” तर एका युजरने लिहिलेय, “भारी आहे.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader