Bhindi Samosa Video : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक गोष्टींबाबत विविधता दिसून येते. भाषा, पेहराव, खाद्य संस्कृती वेगवेगळी दिसून येते. प्रत्येक राज्याची एक आगळी वेगळी खाद्यसंस्कृती आपल्याला पाहायला मिळते. अशात काही लोकं नवनवीन पदार्थ शोधून काढतात.सोशल मीडियावर अनेक विचित्र खाद्य पदार्थ व्हायरल होत असतात. कधी पिंक बिर्याणी तर कधी बिर्याणी मॅगी, कधी आईस्क्रिम समोसा तर कधी थम्स अप पाणीपुरी, हे पदार्थ पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क भेंडी समोसा विकताना दिसत आहे. भेंडी समोसा हे नाव ऐकून तुम्हालाही विचित्र वाटेल. भेंडी समोसाची कोणी कल्पनाही करू शकत नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक समोसाचा गाडा दिसेल. विक्रेता एका द्रोणमध्ये समोसा घेतो आणि समोसाचे दोन तुकडे करतो. यामध्ये बटाट्याच्या भाजीऐवजी भेंडीची भाजी दिसते. त्यानंतर तो त्यावर सांबार टाकतो. त्यानंतर हिरवी चटणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालतो. त्यावर लिंबाचा रस घालतो आणि तळलेल्या हिरवी मिरची सह सर्व्ह करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल.
समोसा हा भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे. भारताच्या विविध भागात लोकं आवडीने समोसा खातात. तुम्ही आजवर बटाट्याच्या भाजीचा समोसा खाल्ला असेल. भेंडी समोसा हे नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकले असावे. जुन्या दिल्लीत हा भेंडी समोसा मिळतो.
हेही वाचा : भारीच! कीपॅडवाल्या मोबाईलवरुन व्यक्तीने केले ऑनलाइन पेमेंट, कसं ते व्हायरल VIDEO मध्ये पहा
foodi_ish या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “समोश्याचे तुम्ही अनेक प्रकार खाल्ले असेल पण तुम्ही कधी भेंडी समोसा खाल्ला आहे का? चवीविषयी बोलायचे तर खूप टेस्टी होता. जुन्या दिल्ली येथील हा भेंडी समोसा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी भेंडीची भाजी खात नाही आणि यांनी समोशात भरली” तर एका युजरने लिहिलेय, “इन्स्टाग्रामवर डिसलाइक बटण असायला पाहिजे होते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून मला बटाट्याचा समोसा खायला सुद्धा आवडणार नाही.”