Viral Video : सोशल मीडियावर खाद्यपदार्थांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही खाद्यपदार्थ खूप हटके असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काळी इडली दिसत आहे. तुम्हाला वाटेल इडली कधी काळी असते का? पण तुम्हाला या व्हिडीओमध्ये चक्क काळी इडली दिसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Have You Ever Tried Black Idli? Viral Video of Kali Idli goes viral on social media)
काळी इडली कधी खाल्ली आहे का? (Kali Idli News)
इडली हा एक असा पदार्थ आहे जो संपूर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो. इडली हा पदार्थ जरी दक्षिण भारतातील असला तरी सर्वत्र लोकप्रिय आहे. इडली हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर पांढऱ्या रंगाची इडली समोर येते. पण तुम्ही काळी इडली खाल्ली आहे का?
या व्हायरल व्हिडीओमध्ये काळी इडली दाखवली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गाडा चालवणारा तरुण काळी इडली बनवताना दिसत आहे. ही मऊशीर दिसणारी काळी इडली पुढे हा तरुण चटणी मसाल्यासह सर्व्ह करताना दिसतो. काळी इडली ही काळी उडीद डाळ किंवा काळे तांदूळ किंवा रागीपासून तयार केली जाते. या व्हिडीओमध्ये इडली तयार करताना कोणते साहित्य वापरलेले आहे, हे सांगितलेले नाही. ८९,७८२ लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
official_food_king_1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काळी इडली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “इंजिन ऑइलची इडली” तर एका युजरने लिहिलेय, “अशी इडली कसं कोण खाऊ शकतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “इडलीचा अपमान करू नका” एक युजर लिहितो, “इडली पाहून खाण्याची हिंमत होणार नाही” तर एक युजर लिहितो, “काळी इडली.. हा काय प्रकार आहे” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून टीका केली आहे.