Gulab Jamun Paratha Recipe : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक नवीन गोष्टी व्हायरल होत असतात. कधी गाणी, कधी डान्स तर कधी एखादा डायलॉग सुद्धा चर्चेत येतो. सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या कला सादर करताना दिसतात. काही लोक हटके आणि स्वादिष्ट असे रेसिपीचे व्हिडीओ सुद्धा शेअर करतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गुलाबजामूनचा पराठा रेसिपी विषयी सांगितले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना प्रश्न पडेल की गुलाबजामूनचा पराठा नेमका कसा तयार करतात? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (do you ever eat gulabjamun paratha video goes viral on social media)
गुलाबजामून पराठा कधी खाल्ला आहे?
तुमच्यापैकी अनेकांना गुलाबजामून खूप आवडत असतील पण तुम्ही कधी गुलाबजामूनचा पराठा खाल्ला आहे का? या व्हायरल व्हिडीओमध्ये या खास पराठ्याविषयी सांगितले आहे.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती गुलाबजामूनचा पराठा तयार करत आहे. कणीकचा गोळा जाडसर लाटून घ्यावा. पुरीच्या आकाराएवढ्या या कणकीमध्ये दोन गुलाबजामून टाकावे आणि त्याचा पुन्हा गोळा तयार करावा. त्यानंतर गव्हाच्या पिठाने या गोळ्याचा पराठा लाटावा. गरम तेलावर तुपासह हा पराठा दोन्ही बाजूने भाजावा. गुलाबजामून पराठा तयार होईल. हा पराठा अतिशय सुरेख दिसतोय.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
youtubeswadofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गुलाबजामून पराठा. तुम्ही कधी खाणार का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे देवा.. काय काय पाहावं लागतं” तर एका युजरने लिहिलेय, “जसा दिसायला चांगला आहे तसा चवीला स्वादिष्ट आहे का?” आणखी एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “मला गुलाबजामूनवर दया आली” अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया देत या रेसिपीवर आश्चर्य व्यक्त केले आहेत.