Viral Video : महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई. हे कळसूबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील सर्वोच्च बिंदू आहे. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी पासून-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव दिसेल. या बारी गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. या शिखरावर कळसूबाई देवीचे मंदिर आहे. दरवर्षी हजारो लोक या शिखराला भेट देतात. सोशल मीडियावर या कळसूबाई शिखरावरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके सुंदर असतात की पाहून आपण स्वर्ग पाहतोय की काय, असे होते.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कळसूबाई शिखरावरून आजुबाजूचा परिसर दाखवला आहे. हा परिसर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (A place which is really beautiful than heaven kalsubai shikhar video goes viral on social media)
स्वर्गापेक्षाही सुंदर आहे महाराष्ट्रातील हे ठिकाण!
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर दृश्य दिसेल. हे निसर्गरम्य दृश्य पाहून कोणीही अवाक् होईल. व्हिडीओ पाहून तुम्हाला आपण स्वर्ग आठवेल. निळे आकाश, पिवळा सूर्य आणि आजुबाजूला पसरलेले धुके अन् ढग. नयनरम्य दृश्य कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही या ठिकाणी एकदा जावंस वाटेल. या व्हिडीओत तुम्हाला काही लोक पायऱ्यावरून उतरताना दिसत आहे. विशेष म्हणजे ढगांमुळे आणि धुक्यांमुळे समोरचा रस्ता दिसत नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “कळसूबाई शिखर, महाराष्ट्र”
हेही वाचा : प्रत्येकाचं आयुष्य हे सारखं नसतं! एकीकडे आवड तर दुसरीकडे जबाबदारी; VIDEO पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावतील
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
itsvirajkale99 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महाराष्ट्रातील स्वर्ग” या व्हिडीओवर लिहिलेय, “शंभर टक्के शांतता” तर एका युजरने लिहिलेय, “जीवंतपणी स्वर्गाचे दर्शन” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप मस्त आहे हे खरंच इथे लोक जास्त नवरात्रीमध्ये जातात पण खरंच खूप मस्त वाटतं हा सगळा निसर्ग बघितल्यावर” अनेक युजर्सनी या ठिकाणचे त्यांचे अनुभव सांगितले आहे.