Viral Video : वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांती देशभरात उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या शुभ दिवसावर तिळगुळ खाणे, नदीत स्नान करणे, पतंग उडवणे, इत्यादी प्रथा पाळल्या जातात. यातील पतंग उडवण्याची प्रथा ही अतिशय लोकप्रिय आहे. मकर संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वीच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण आवडीने पतंग उडवतात. पण तुम्ही कधी माकडाला पतंग उडवताना पाहिले आहे का? होय, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क माकड पतंग उडवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (do you ever see a monkey flying a kite watch Banaras viral video in on social media)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका घराच्या टेरेसवर माकड दिसेल आणि हे माकड हातात दोरा घेऊन पतंग उडवताना दिसत आहे. अनेक जण कदाचित पहिल्यांदा माकडाला पतंग उडवताना पाहत असेल. माकडाला पतंग उडवताना पाहून आश्चर्यचकीत होऊ काही लोक ओरडताना सुद्धा दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. हा व्हिडीओ बनारस म्हणजे काशी येथील आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “हे बनारस आहे गुरू येथे माकड सुद्धा पतंग उडवतात”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
mahadev__833 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे बनारस आहे गुरू, येथे काहीही होऊ शकतं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा एक रेकॉर्ड बनवला ज्याला कोणी तोडू शकत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “येथील माकड खूप हुशार आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे शिवशंकराची नगरी आहे, येथेही काहीही होऊ शकते. एक युजर लिहितो, “काशी हे एक महान शहर आहे” तर एक युजर लिहितो, “माकडाला खरंच एवढी बुद्धी असते” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.