Viral Video : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. रयतेचे राजे म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक लोक जीवापाड प्रेम करतात. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जगतात.महाराजांचा इतिहास कायम स्मरणात राहावा म्हणून गड किल्ल्यांना भेटी देतात. अनेक लोकं प्रेमापोटी त्यांचे फोटो, पोस्टर गाडीवर सुद्धा लावतात. तुम्ही सुद्धा अशा अनेक गाड्या बघितल्या असतील ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तुमच्याही गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे का? जर हो तर हा व्हिडीओ नक्की पाहा कारण या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दुचाकी चालक भर रस्त्यात गाडीवर लावलेल्या महाराजांच्या प्रतिमेवरील धूळ स्वच्छ करताना दिसत आहे.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अनेक जण महाराजांविषयी प्रेम व्यक्त करत गाडीवर आवडीचे त्यांचे फोटो किंवा पोस्टर लावतात पण रस्त्यावरील धूळ या फोटोवर किंवा पोस्टरवर पडते. गाडीवर आवडीने महाराजांचा फोटो लावणाऱ्यांना मात्र महाराजांच्या प्रतिमेवरील धूळ स्वच्छ करायला सुद्धा वेळ मिळत नाही.या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला हेच दिसून येईल. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका तरुणाला त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या चारचाकीवर महाराजांची प्रतिमा दिसते. प्रतिमेवर खूप धूळ बसलेली पाहून तो भर रस्त्यात धूळ स्वच्छ करतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : खरे हिरो! महिला पोलिस कर्मचाऱ्याने वाचवला एका महिलेचा जीव, व्हिडीओ होतोय व्हायरल

rushi.pawar7777 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मानलं भाऊ तुला छत्रपतीप्रेमी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुला पाहून काही जण हसले असतील तुझ्यावर पण तुला मानाचा मुजरा भावा जय शिवराय” तर एका युजरने लिहिलेय, “गाडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावणे बंद केले पाहिजे आपण” आणि एका युजरने लिहिलेय, “अरे भावा जर वेळ नाही गाडी पुसायला तर कशाला गाडीवर फोटो लावतो” अनेक युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.”

Story img Loader