Viral Video : पंतप्रधान मोदी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येतात. त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा आवाजातील मराठी गाणं ऐकू येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कदाचित व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की हे गाणं मोदींनी गायले आहे पण खरंच हे गाणं मोदींनी गायले आहेत का? हा आवाज मोदीचा आहे मग गाणं खरंच मोदीजी गात आहेत का? असे अनेक प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडू शकतात. आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गिटार हातात घेऊन बसलेला फोटो दिसेल आणि त्यांच्या शेजारी ‘जीव रंगला’ गाण्याचे पोस्टर दिसेल. या व्हिडीओवर हे दोन फोटो लावून त्यावर मोदींच्या आवाजातील ‘जीव रंगला’ हे गाणं ऐकू येईल. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “अजय अतुल जीव रंगला मोदीजी व्हर्जन”
खरंच हे गाणं मोदींनी गायले आहेत का?
या व्हिडीओमधील गाणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हे गाणं ऐकून तुम्हाला वाटेल हे गाणं मोदींनी गायले आहे. पण खरंच हे गाणं मोदींनी गायले का? तर अजिबात नाही. हे गाणं मोदींच्या आवाजातील आहे पण मोदींनी गायले नाही. हे गाणं एआय(AI) निर्मित आहे. मोदींचा आवाज वापरुन हे गाणं तयार करण्यात आले आहे. एआयची ही अनोखी क्रिएटिव्हीटी पाहून कोणीही थक्क होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर सर्वच क्षेत्रात वेगाने वाढतोय. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने एआयचा वापर करताना दिसत आहे.
AI WALLAH या युट्यूब अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जीव रंगला, मोदीजी व्हर्जन” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.