Viral Video : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. हिरवा निसर्ग बघण्यासाठी लोक वीकेंडला घराबाहेर पडत आहे. जवळपासचे गडकिल्ले, डोंगर, तलाव, धबधबे पाहायला जात आहे तर काही लोकांना प्रश्न पडतोय की पुढच्या वीकेंडला कुठे जावे?

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील अशा ठिकाणाविषयी सांगितले ज्या ठिकाणाला महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल ही नेमकी कोणती जागा आहे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (do you heaven in Maharashtra Jivdhan Fort 100 km away from pune watch video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर निसर्गरम्य जागा दिसेल. सगळीकडे हिरवेगार झाडी आणि पांढरी धुके पसरली आहे. स्वर्गाहून सुंदर असे हे ठिकाण आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “महाराष्ट्रातील स्वर्ग, पुण्यापासून १०० किमी”
व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल ही जागा म्हणजे जीवधन घाटघर आहे. नाणेघाटापासून अगदी जवळ असलेला जीवधन किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी असलेले गाव म्हणजे घाटघर होय. सध्या पावसाळ्यात लोक जीवधन किल्ल्यावर खूप गर्दी करतात. पावसाळ्यात येथील नयनरम्य दृश्य बघण्यासाठी भरपूर लोक वीकेंडला येतात. पुण्यापासून फक्त १०० किमी दूर आहे. त्यामुळे वीकेंडला तुम्ही या खास ठिकाणी जाऊ शकता.

हेही वाचा : काकूंना सावरणार कोण? मेट्रोत तरुणीचा अश्लील नाच बघून प्रवासी महिलेला धक्का; Video पाहून हसावं की रडावं कळेना!

पाहा व्हायरल व्हिडीओ

iloovepune’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्वर्ग… जीवधन,घाटघर” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला असून यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.काही लोकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला; रस्त्यावर फरपटत नेत ओरबाडलं अन्…; घटनेचा थरारक Video

जीवधनला कसे जावे?

जीवधन हा किल्ला म्हणजे चहूबाजूने उभा तुटलेला एक कडा आहे. पुणे जिल्हय़ातील जुन्नरपासून २७ किलोमीटरवर प्राचीन नाणेघाटाजवळ असलेला हा किल्ला.इथे येण्यासाठी जुन्नरहून सुटणारी घाटघर एसटी बस सोयीची ठरते. मुंबई-ठाण्याकडून येणाऱ्यांनी कल्याणहून माळशेज घाटाच्या दिशेने धावणाऱ्या एसटी बसने वैशाखरे थांब्यावर उतरावे आणि नाणेघाट चढून जीवधनला पोहोचते व्हावे. गडावर जाण्यासाठी पायथ्याजवळ असलेल्या घाटघर गावातूनच रस्ता जातो.