Pune Video : पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे येथील पाहायला दूरवरून लोक येतात. पुणे व पुणे शहराच्या आजूबाजूला असे कितीतरी सुंदर ठिकाणे आहेत ज्या विषयी अनेक लोकांना अजूनही माहिती नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्याजवळील एक सुंदर मंदिर दाखवले आहे. या मंदिराचा परिसर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नदीकाठी वसलेले हे सुंदर मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला या मंदिराला एकदा तरी भेट द्यावीशी वाटेल.
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला नदीकाठी एक सुंदर मंदिर दिसेल. या मंदिराचा सुंदर परिसर या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर टाकतो. आजूबाजूला हिरवा निसर्ग आणि त्यात नदीकाठी वसलेले मंदिर अधिक आकर्षक दिसते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिर नेमके कुठे आहे? आणि पुण्यापासून किती दूर आहे?
या सुंदर ठिकाणाचे नाव रामदरा आहे. हे रामदरा मंदिर पुण्यापासून फक्त ५० किमी असून पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या लोणी काळभोर गावात आहे. हे मंदिर शिवाचे आहे पण येथे तुम्हाला राम लक्ष्मण आणि सीता तसेच दत्तगुरूच्या मूर्तीचे सुद्धा दर्शन घेता येते. एक दिवसीय सहलीसाठी हे उत्तम ठिकाण असून दरदिवशी येथे हजारो लोक येतात. व्हिडिओत सांगितलेल्या माहितीनुसार, हे मंदिर १९७० रोजी बांधण्यात आले आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ (Viral Video)
Welovepune_official या इंस्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलेय, “गेला आहात का पुण्याजवळील या मंदिरात” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “रामदरा लोणी काळभोर” तर एका युजरने लिहिलेय, “सर्वांनी एकदा तरी भेट दिली पाहिजे या मंदिराला”
यापूर्वी पुण्यातील असे अनेक सुंदर मंदिरांचे व्हिडिओ समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यापासून फक्त २५ किमी वर असलेल्या कलश मंदिराचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
© IE Online Media Services (P) Ltd