Banana Bhaji Video : सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. पाऊस म्हटलं की, अनेकांना गरमागरम भजी खावीशी वाटतात. सहसा आपण बटाटा, मिरची किंवा कांदा भजी खातो, पण तुम्ही कधी केळीची भजी खाल्ली आहेत का? तुम्हाला वाटेल की केळीची भजी कशी बनवतात? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला चुलीवर केळीची भजी करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला चुलीवर गरमागरम केळीची भजी बनवताना दिसत आहे. या महिलेने घराच्या अंगणात चूल पेटवली आहे आणि चुलीवर मोठी कढई ठेवून तेलातून भजी काढताना दिसत आहे.
हेही वाचा : हृदयस्पर्शी! नातीच्या वाढदिवसाला आजीचा उत्साह पाहण्यासारखा, आनंदाने उड्या मारत आजीने दिल्या शुभेच्छा
केळीची भजी कशी बनवतात?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक महिला केळीची भजी बनवत आहे. सुरुवातीला ती केळी तेलातून तळून घेते. त्यानंतर तळलेल्या केळीचे साल काढते. केळीचा कुस्कारा करते आणि त्यात कांदा, बेसन, तिखट-मीठ, जिरे, ओवा, कोथिंबीर असे कांद्याच्या भज्यांप्रमाणे मिश्रण तयार करते आणि गरमागरम तेलातून भजी काढते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल.
हेही वाचा :बापरे! चक्क माकडांना दारु पाजली अन्…, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का
hetal_diy_queen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “केळी भज्यांची रेसिपी.” या व्हिडीओवर लाखो लोकांच्या लाइक्स आल्या असून हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.