‘LG’जी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची वेगवेगळी उत्पादने आपल्याला माहिती असतात. मात्र, ‘LG’चा नेमका अर्थ काय हे फार कमी जणांना माहिती असते. असाच विचार करुन या गोष्टीचा शोध घ्यायचा ठरवले आणि अतिशय आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. १९५८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या कंपनीचे नाव सुरुवातीला गोल्डस्टार होते. कालांतराने १९९५ मध्ये कंपनीचे लकी केमिकल या कंपनीसोबत एकत्रीकरण करण्यात आले. लकी या नावामुळे पुढे ‘LG’चे नाव लकी गोल्डस्टार झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळ साऊथ कोरियाच्या असलेल्या या कंपनीचे मुख्य ऑफीस साऊथ कोरियाची राजधानी सेऊल येथे असून, जगभरात कंपनीची ११९ कार्यालये आहेत. सध्या कंपनीचे एकूण ८२ हजार कर्मचारी आहेत. सध्या कंपनी घरगुती उपकरणे, मोबाईल, घरातील मनोरंजनाची साधने आणि गाड्यांचे भाग तयार करण्याच्या उद्योगात अग्रेसर आहे. भारतात मुख्यतः रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनमध्ये कंपनी आघाडीवर असून, २०११ मध्ये ‘LG’ टीव्ही बनविणारी दुसरी मोठी कंपनी होती.

आपण अनेकदा मोठ्या ब्रॅंडचा वापर करतो मात्र त्याचा फूलफॉर्म काय असतो याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. ‘प्रिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘व्हीलेज रोडशो लिमिटेड’ या दोन कंपन्यांनी एकत्र येत १९९५ मध्ये ‘PVR’ हा संयुक्त उद्योग सुरु केला. दोन्ही कंपनींच्या नावांचा समावेश या नव्या नावात असावा या उद्देशाने या नव्या उद्योगसमूहाचे नाव प्रिया व्हीलेज रोडशो असे ठेवण्यात आले.