पीव्हीआरमध्ये सिनेमा पहायला जाणे हे सध्या ‘स्टेटस सिम्बल’ समजले जाते. पण पीव्हीआर म्हणजे काय किंवा याचा फूल फॉर्म काय होतो याचा तुम्ही कधी विचार केलाय? नाही ना…मग हे ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. पीव्हीआरचा म्हणजे ‘प्रिया व्हीलेज रोडशो’ असा आहे. ऐकायला काहीसे वेगळे वाटत असले तरीही दोन नामांकित कंपन्यांच्या नावांचे एकत्रिकरण यामध्ये करण्यात आल्याने हे नाव आश्चर्यकारक बनले आहे.
आपण अनेकदा मोठ्या ब्रॅंडचा वापर करतो मात्र त्याचा फूलफॉर्म काय असतो याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. ‘प्रिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘व्हीलेज रोडशो लिमिटेड’ या दोन कंपन्यांनी एकत्र येत १९९५ मध्ये ‘PVR’ हा संयुक्त उद्योग सुरु केला. दोन्ही कंपनींच्या नावांचा समावेश या नव्या नावात असावा या उद्देशाने या नव्या उद्योगसमूहाचे नाव प्रिया व्हीलेज रोडशो असे ठेवण्यात आले.
हे नाव घेण्यासाठी मोठे असल्याने त्याचा शॉर्टफॉर्म वापरण्यात आला. तेव्हा सिनेमा पाहण्यासाठी मल्टीप्लेक्सला पसंती देताना पीव्हीआरचा फूलफॉर्म ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही हेच खरे.