Viral video: हिंग रोजच्या जेवणात हमखास वापरला जाणारा मसल्याचा पदार्थ. काहीसा उग्र चवीचा हिंग भारतीय पदार्थांत हमखास वापरला जातो. स्वयंपाकघरात बनविल्या जाणाऱ्या पदार्थांना फोडणी देण्यासाठी प्रामुख्याने हिंगाचा उपयोग केला जातो.अगदी चिवड्यापासून ते थेट साठवणीतील लोणच्यापर्यंत सगळ्या पदार्थातच हिंगाचा वापर केला जातो. एवढंच नव्हे तर आयुर्वेदानुसार हिंगाचे महत्त्व अधिक आहे. जवळपास सगळेच मसाल्याचे पदार्थ कसे बनवले जातात हे आपल्याला माहिती आहे. मात्र तुम्हाला माहितीये का हिंग कसे बनवले जाते? चला तर हिंग नक्की कसे बनवले जाते आणि कसे आपल्यापर्यंत पोहचते पाहुयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंग बनवतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आपण सहज वापर असलेली हिंग बनवण्यासाठी किती मेहनत आणि वेळ लागतो हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कारखान्यात हिंग बनवण्याची प्रक्रिया दिसत आहे. यावेळी झाडाच्या मुळातून डिंक काढला जात आहे. ही प्रक्रीया वाटते तेवढी सोपी नाही. या झाडाचं खोड कापताना त्या खोडाचा व्यास १२ ते १४ सेमी व्हावा लागतो. एका वनस्पतीपासून साधारण अर्धा किलो हिंग काढले जाते. थंड, कोरड्या हवामानात याची वाढ होते. त्यानंतर हा डिंक पिठात मिक्स करुन त्याचे छोटे छोटे तुकडे करुन वाळत घातले आहेत. त्यानंतर मग त्याची पावडर करुन त्याला पॅक केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मरीन ड्राईव्हवर तरुणाला शहाणपणा नडला; प्रपोज करायला गेला अन् मार खाऊन आला; तरुणीनं अक्षरशः…

श्‍वसनाशी संबंधित आजारांवर हिंग फायदेशीर आहे, असे मानले जाते. हे रक्तसंचय, खोकला आणि दमा या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की हिंग ब्रोन्कोडायलेटर म्हणून कार्य करू शकते, ज्यामुळे श्वास घेणे आणि बाहेर टाकणे सोपे होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know how to make asafoetida that enhances the taste of food video viral srk