Ganpati immersion procession in Pune in 1991 :पुण्यात नुकताच गणेशोत्सव उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. दरवर्षी गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे आगमन होते आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन होते. यंदाही ढोल-ताशांच्या गजरामध्ये मानाच्या गणपतीचे आगमन आणि विसर्जन पार पडले. हा सोहळा पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यात अनेकांनी आपल्या कला सादर केले. कोणी तलवारबाजी करताना दिसते तर कोणी लाठी-काठी सादर करताना दिसले. पुण्याला लाभलेला गणेशोत्सवाचा वारसा ऐतिहासिक आहे. लोकमान्य टिळकांना १८९३ सालापासून गणेशोत्सव सार्वजनिक पातळीवर साजरा करण्यास सुरुवात केली. १८९३ पूर्वीही गणेश चतुर्थी साजरी केली जात असे पण हे सण कौटुंबिक पातळीवर साजरा केले जात असते. त्या काळातील गणेशोत्सव कसा असेल याची उत्सुकता आपल्यापैकी सर्वांनाच वाटते. सध्या १९९१ मधील पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुणेकर थक्क झाले आहेत. व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

अशी होती १९९१ मधील पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक

व्हायरल व्हिडीओनुसार, १९९१मधील गणेशोत्सवामध्ये ज्ञानप्रबोधनीचे ढोल ताशा पथक वादन सादर करताना दिसत आहे. सुरक्षा बंदोबस्त पाहणारे खाकी वर्दीतील पोलि‍सांचा मोठा ताफा आहे. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमलेली दिसत आहे. यापैकी अनेकांनी गांधी टोपी परिधान केली आहे. बैलगाडीमधून मानाच्या गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात येत आहे. बैलगाडीवर सुंदर रथ तयार करण्यात आला आहे. याबरोबर पारंपारिक वाद्य वापरून वादन करणारे लोक दिसत आहे ज्यांनी पारंपारिक वेषभूषा केली आहे. एका बैलगाडीमध्ये पारंपारिक नऊवारी साडी आणि दागिने परिधान करून बैलगाडीमध्ये काही महिला उभ्या असल्याचे दिसते. त्यापैकी कोणी मानाचा मुजरा करताना दिसत आहे तर कोणी भगवा ध्वज हातात घेतलेला दिसत आहे. तसेच बैलगाडीमध्ये पोतराजदेखील उभा असल्याचे दिसते आहे. काही मोठं मोठे मुखवटे चेहर्‍याला लावून किंवा डोक्यावर ठेवून मिरवणुकीत चालताना दिसत आहे. एकाने दहा तोंडी रावणाच मुखवटा परिधान केला आहे. महाराष्ट्रातील विविध समुदाय आपले पारंपारिक नृत्य सादर करताना दिसत आहे.

हेही वाचा – “याला म्हणतात मेड इन चायना!” कुत्र्यांनाच काळा-पांढरा रंग देऊन बनवले पांडा; शेवटी सत्य झालं उघड, पाहा Viral Video

जुने पुणे पाहून नेटकरी झाले भावूक

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गणेशोत्सवाचे स्वरूप किती बदलले आहे हे लक्षात येते. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर kothrudkarpune आणि pcmc_kar या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले आहे की, १९९१मधील पुण्यातील गणेशोत्सव. हा व्हिडिओ मुळत:: युट्युबवर पोस्ट केलेला आहे.

हेही वाचा –किती गोड! वर्गमित्रांबरोबर नेपाळी गाण्यावर नाचतेय चिमुकली, गोंडस Video Viral

व्हिडिओ पाहून थक्क झालेल्या पुणेकरांनी कमेंट करून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकाने लिहिले,”हा इतका जुना इतिहास कुठे सापडला?”

दुसर्‍याने लिहिले, “गरीबी होती पण काळ चांगला होता.”

तिसर्‍याने लिहिले की, “गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी”

चौथ्याने लिहिले, “आता संस्कृती दिसत नाही, आता फक्त झापुक झुपुक”

पाचव्याने लिहिले, “जून ते सोनं, मनमुराद आनंद घेत होते लोक त्यावेळची”

आणखी एकाने लिहिले की, “पुन्हा सुरू करूयात पुन्हा सुरू करूयात, ध्वनी प्रदूषण विरहित गणपती विसर्जन”