गणित हा असा विषय आहे, जो काही लोकांना आवडतो तर काही लोकांना आवडत नाही. ज्या लोकांना गणित आवडत नाही, असे लोक तुमच्या आजुबाजूला बरेच असतील. लहानपणापासून तुम्ही गणित विषय शिकत आलेला आहात. तुम्हाला गणित म्हणजेच MATHS चा फुल फॉर्म माहितेय का? MATHS चा फुल फॉर्म Mathematics असा होतो पण सध्या एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात की MATHS चा फुल फॉर्म काय आहे, त्यावर एक विद्यार्थी भन्नाट उत्तर देताना दिसून येतो. त्याचे उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video: Student told Hilarious Math Full Form funny Answer goes viral)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

MATHS चा फुल फॉर्म माहितेय? विद्यार्थ्याने दिले भन्नाट उत्तर

हा व्हायरल व्हिडीओमध्ये एका वर्गातील आहे. व्हिडीओमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना उद्देशून विचारतात, “येथे कोण मला सांगणार की MATHS चा फुल फॉर्म काय आहे?” तेव्हा एक विद्यार्थी जागेवरून उठतो आणि म्हणतो, “मेरी आत्मा तुम्हे हमेशा सताएगी” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ मिर्झापूर या लोकप्रिय वेबसीरीजमधील आहे जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मिर्झापूर ही लोकप्रिय वेबसीरीज आहे या सीरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये हा मजेशीर सीन दाखवला आहे.

हेही वाचा : “देव नाही पण माणूस होऊन पाहा”! रस्त्यावर पाण्यासाठी भटकणाऱ्या गरीब चिमुकल्यांचा Video पाहा; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ ( Viral Video)

हेही वाचा : “कोणताही दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही..”; मनोज बाजपेयींना असे का वाटते? तज्ज्ञांनी केला खुलासा

krish_wri8s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” MATHS चा फुल फॉर्म” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर उत्तर” तर एका युजरने लिहिलेय, “MATHS चा फुल फॉर्म – मेंटल अटॅक टू हेल्दी स्टुडंट” आणखी एका युजरने लिहिलेय, “MATHS म्हणजे शांती, आनंद आणि सुख” एक युजर लिहितो, “खरं सांगितले.. मला गणित अजिबात आवडत नाही.” अनेक युजर्सनी या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know maths full form a student has given funny answer video goes viral on social media ndj