Viral Video : साप हा शब्द जरी कानावर पडला तरी अंगावर काटा येतो. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वच सापाला धाबरतात. सापाच्या विषामुळे अनेकदा लोकांना जीव सुद्धा गमवावा लागतो त्यामुळे सापाला सर्वच घाबरतात. साप जर एखाद्याला चावला तर त्याचा जीव वाचविणे खूप कठीण जाते. तुम्हाला माहिती आहे का सापाचे विष आपल्या मानवी रक्तावर कसा परिणाम करतात? सध्या एका व्हायरल व्हिडीओत याविषयी सांगितले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सापाच्या विषाचा रक्तावर कसा परिणाम होतो, हे दाखवले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्हिडीओ पाहून काही लोकांच्या अंगावर काटाही येऊ शकतो.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओत एक प्रयोग करून दाखवला आहे. या प्रयोगातून दाखवले आहे की कशाप्रमाणे साप माणसाच्या रक्तावर परिणाम करतो. या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती तज्ज्ञांची मदत घेऊन सापाचे विष एका काचेच्या भांड्यात टाकतात. त्यानंतर ती व्यक्ती सापाच्या विषाला एका सिरिजमध्ये भरते.त्यानंतर तुम्हाला दिसेल एका कपामध्ये असलेल्या रक्तामध्ये विषाचा एक थेंब टाकते आणि हे विष रक्तात चांगल्याने एकत्रित करते. त्यानंतर रक्त गोठून आणखी घट्ट होते. व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की विषाचा एक थेंब तुमच्या रक्तावर किती खोलवर परिणाम करतो. हा व्हायरल व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Shocking video Cow attack on peoples children on road dangerous shocking video viral on social Media
भयंकर! गायीचा एकावेळी तिघांवर जीवघेणा हल्ला, टोकदार शिंग पोटात घुसवलं पायांनी तुडवलं अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल
Giant python shocking video
शिकारीसाठी महाकाय अजगर कालव्यात शिरला अन् झाला गेम; पाण्यात गुदरमला अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
Mother making reels while holding baby in building open terrace shocking video goes viral
एका रीलसाठी आईनं हद्दच पार केली; पोटच्या लेकराला बिल्डिंगच्या टोकावर बसवलं अन्…काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
Railway crossing accident See what happened next when the entire dumper overturned on the car video goes viral
“संपत्ती प्रामाणीकपणाची असेल तर देवही रक्षण करतो” संपूर्ण डंपर कारवर पलटी होणार तेवढ्यात काय घडलं पाहा; VIDEO व्हायरल
The woman watered to the monkey
‘आई तू खरंच देवासारखी आहेस…’ तहानलेल्या माकडाला मिळाली आईची माया… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “आई ती आईच”

हेही वाचा : VIDEO : “बापाची सावली फार महत्त्वाची आहे” आजोबांनी सांगितले वडिलांचे महत्त्व, पाहा व्हायरल व्हिडीओ

cooltechtipz या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सापाच्या विषाचा रक्तावर होणारा परिणाम” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे पाहतानाच किती भीतीदायक वाटते” तर एका युजरने विषामुळे गोठलेल्या रक्तासाठी लिहिलेय, “ब्लड केक” आणखी एका युजरने लिहिलेय, “बापरे, रक्त गोठते.” हा व्हिडीओ पाहून अनेक जण अवाक् झाले आहे. काही लोकांनी व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे, सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

Story img Loader