Nagpur’s The Oldest Pani Puri Viral Video : पाणीपुरी हा शब्द जरी उच्चारला तरी तोंडाला पाणी सुटते. भारतात सर्वात लोकप्रिय असे हे स्ट्रीट फूड आहे. पुरी, बटाटा, चिंचेची चटणी, पुदिना चटणीने तयार केलेली ही पाणीपुरी अतिशय चवीने खाल्ली जाते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना पाणीपुरी आवडते.
देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची पाणीपुरी मिळते. प्रत्येक शहरातील एखाद्या ठिकाणची पाणीपुरी अतिशय लोकप्रिय असते. त्या पाणीपुरीच्या स्टॉलवर लोक खूप गर्दी करतात.
आज आपण महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातील लोकप्रिय पाणीपुरी स्टॉलविषयी जाणून घेणार आहोत. ही नागपूरातील सर्वात जुनी पाणीपुरी आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका डिजिटल क्रिएटर सुकिर्त गुमास्ते याने नागपूरच्या या जुन्या पाणीपुरीविषयी सांगितले आहे.
नागपूरातील सर्वात जुनी पाणीपुरी कधी खाल्ली का?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुकिर्त गुमास्ते सांगतो, “पुणे मुंबईला रगडा असतात, त्यासा वरण म्हणतात मराठवाड्यातील किंवा विदर्भातील लोक. तर येथे बटाट्याची भाजी आहे वरण नाही. तुम्ही म्हणाल की नागपूरच्या गल्ली गल्लीत पाणीपुरीवाले आहे पण हा जो पाणीपुरीवाला आपण शोधला आहे, तो १९७४ पासून आहे आणि लय फेमस आहे बघू या तिथली पाणीपुरी कशी आहे?
त्यानंतर सुकिर्त त्या पाणीपुरीच्या स्टॉलजवळ जातो. त्यानंतर सुकिर्त एक प्लेट पाणीपुरी मागतो आणि ही पाणीपुरी टेस्ट केल्यानंतर सुकिर्तच्या तोंडून झकास आणि म्हणतो माझे सर्व टेस्ट बर्ड आहेत ना ते सर्व जागे झालेत अचानक. इतकी चटकदार चव आहे. यांचं गोड पाणी पूर्णपणे वेगळं आहे आणि तिखट पाणी आहे ना ते पण पूर्णपणे वेगळं आहे. रगड्यामध्ये बटाटा आहे आणि थोडा वाटाणा आहे. सुरेख. बरं कधी आलात नागपूरला, तर बजरंग पाणीपुरी खायलाच पाहिजे.पाणीपुरी स्टॉल विक्रेता सांगतो की येथे हिरवी मिरची असते, लाल मिरची आपण टाकत नाही.सुकिर्त सांगतो की ही वेगळी चव हिरव्या मिरचीची आहे. या पाणीपुरीच्या स्टॉलचे नाव आहे बजरंग पाणीपुरी. हा पाणीपुरीचा स्टॉल महालमधील कल्याणेश्वर मंदिर रोडला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
sukirtgumaste या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमच्या इथं कसली पाणीपुरी मिळते?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “विदर्भातील पाणीपुरी खूप भारी असते” तर एका युजरने लिहिलेय, “नागपूरच्या पाणीपुरीमध्ये पाणी तरी देतात नाही तर पुण्यामध्ये वरण पुरीच” आणखी एका युजरने लिहिलेय, “या कधी अकोल्यात, इथे प्रत्येक गाडी वर पाण्याची टेस्ट वेगळी अन् युनिक आहे” अनेक युजर्सनी त्यांच्या शहरातील पाणीपुरीचे कौतुक केले आहेत.