आजपर्यंत तुम्ही विविध पदार्थांच्या अगणित रेसिपी पहिल्या असतील, त्यातील काही पदार्थ शिकून घेतले असतील. परंतु रणरणत्या उन्हातून घरी आल्यावर शरीराला थंडावा पोहोचवणाऱ्या आणि आपली तहान शमवणाऱ्या एक ग्लास थंडगार पाण्याची रेसिपी कधी पहिली आहेत का? आता तुम्ही म्हणाल कि एक ग्लास पाण्याचा आणि रेसिपीचा काय संबंध? मात्र हा संबंध सोशल मीडियावरील एका अवलियाने लावून दाखवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर foodkagechris नावाच्या अकाउंटने एक ग्लास पाण्याची ही मजेशीर रेसिपी बनवून दाखवली असून, त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेमके त्याने हे कसे केले आहे ते पाहू. तर एक ग्लास पाणी बनवण्यासाठी व्हिडीओमधील व्यक्ती सुरवातीला गॅसवर एक पॅन ठेवते त्यामध्ये बर्फाचे तीन चौकोनी खडे वितळवण्यासाठी ठेवते. नंतर त्यामध्ये बर्फाचा एक खडा किसून घालतो आणि वरून एक मग पाणी ओतून घेतो. आता पॅनमधल्या पाण्याला वरून ब्लो टॉर्चच्या मदतीने थोडी आग दाखवून पॅनमधील पाणी ढवळून घेते.

हेही वाचा : गोंडस चिमुकल्या शेफने बनविले आजोबांसाठी सॅण्डविच! व्हायरल Video पाहून तुम्हीही कराल कौतुक…

आता बर्फाचा अजून एक खडा बारीक चिरून तोदेखील पॅनमध्ये घालतो आणि पॅनमधले पाणी ढवळून एका स्टीलच्या ग्लासमध्ये ओतून घेतो; आणि त्यामध्ये खलबत्याने ठेचलेले बर्फाचे गोळे ग्लासात टाकतो. त्यानंतर, एका काचेच्या ग्लासात थोडे पाणी घालून, त्यामध्ये मीठ टाकावे तसे ‘चवीनुसार’ अजून थोडेसे पाणी घालतो. आता सर्व पाणी एका शेकरमध्ये एकत्र करून चांगले मिक्स करतो. सर्वात शेवटी, एका काचेच्या ग्लासमध्ये काही बर्फाचे खडे घालून त्यामध्ये २ चमचे मिक्सरमध्ये बारीक केलेला बर्फाचा चुरा घालून घेतो आणि शेकरमध्ये मिक्स केलेले पाणी ओततो. सजावट म्हणून, बर्फाचा एक खडा थोडासा वितळवून आणि किसून ग्लासमध्ये घालतो. तयार झालेले एक ग्लास थंडगार पाणी स्ट्रॉने पियुन दाखवतो. अशी ही रेसिपी आपण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ पाहू शकतो.

अर्थात हा व्हिडीओ मजा म्हणून बनवला आहे. मात्र या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ज्या एकापेक्षा एक प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहू.

“मला या रेसिपीचे साहित्य मिळू शकते का?” असे एकाने लिहिले आहे.
“अरे थोडे पाणी घालायचे राहिले.” अशी मिश्किल प्रतिक्रिया दुसऱ्याने लिहिली.
“यामध्ये किती कॅलरीज असतील?” असा प्रश्न तिसरा विचारतो आहे.
“हा व्हिडीओ पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले” असे चौथ्याने लिहिले.
“रेसिपीमध्ये पाणी जरा कमीच आहे.” असे पाचव्याने म्हंटले.

हेही वाचा : ‘गुलाबी साडी अन् लाली लाल लाल’ ट्रेंडवर आजीबाईंनी केला भन्नाट डान्स; पाहा हा व्हायरल Video….

व्हिडिओ पाहा :

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @foodkagechris नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओला आत्तापर्यंत १०० मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the recipe of a glass of water watch funny viral video and read netizens hilarious comments dha