किंग कोब्रा हा सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. या सापाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात विष असतं. किंग कोब्रा फक्त इतर प्राणीच खातात असे नाही तर ते इतर किंग कोब्राला देखील खातात. साप हे त्यांचे आवडते खाद्य आहे. जर साप जवळपास आढळले नाहीत तर ते सरडे आणि इतर लहान सस्तन प्राणी देखील खातात. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे.
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. जंगलातील एक थरारक दृश्य आयएफएस अधिकारी यांच्या कॅमेरात कैद झालं आहे. एक किंग कोब्रा दुसऱ्या किंग कोब्राला खाताना दिसत आहे. पण, तुम्हाला किंग कोब्राचे वैज्ञानिक नाव माहिती आहे का? नाही… तर किंग कोब्राचे वैज्ञानिक नाव ओफिओफॅगस हॅना (Ophiophagus Hannah) असे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नाव कशावरून ठेवण्यात आलं ? तर या प्रश्नाचे उत्तर आयएफएस अधिकारी यांनी पोस्टमध्ये दिलं आहे. एकदा पाहाच ही पोस्ट…
पोस्ट नक्की बघा …
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी लिहिले की, “उत्तरेतील राजा किंग कोब्रा दुसऱ्या किंग कोब्राला खातानाचे थरारक दृश्य. किंग कोब्राचे वैज्ञानिक नाव ‘ओफिओफॅगस हॅना’ (Ophiophagus Hannah) असे आहे. ओफिओफॅगस (Ophiophagus) हे ग्रीक भाषेतून आलेलं नाव आहे ; ज्याचा अर्थ साप खाणे असा होतो. तर ग्रीक पौराणिक कथेतील अप्सरांच्या नावावरून हॅना (Hannah ) हे नाव देण्यात आलं आहे” ; अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांच्या @ParveenKaswan या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. नेटकरी ही पोस्ट पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत व आयएफएस अधिकारी यांच्या या खास क्लिकचं कौतुक तर त्यांना विविध प्रश्न विचारताही कमेंटमध्ये दिसून आले आहेत.