भारतातील हिंदू-मुस्लिम वाद काही नवा नाही. दररोज वेगवेगळ्या कारणांमुळे हिंदू-मुस्लिम वादांच्या संबंधित बातम्या आपण वाचत असतो. सध्या असाच एक वाद सुरु आहे. एका नामांकित कंपनीच्या चिवड्याच्या पाकिटावरील उर्दू मजकूरामुळे सोशल मीडियावर सध्या वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. परंतु अनेक कंपन्या उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये वेगवेगळ्या भाषेत आपल्या उत्पादनांबद्दल माहिती छापतात. यामध्ये उर्दू भाषेचाही समावेश असतो. इतकंच नाही, तर आपल्या देशातील नोटांवरही उर्दू भाषेचा वापर केला गेला आहे. आज आपण जाणून घेऊया भारतीय चलनातील नोटांवर उर्दूसह आणखी कोण-कोणत्या भाषांचा समावेश आहे.

आपल्या देशात बँक ऑफ हिंदुस्थान, जनरल बँक ऑफ बंगाल या बँकांनी सर्वप्रथम १८व्या शतकात कागदाच्या नोटा छापल्या आणि बाजारात आणल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळ्या धातूंची नाणी बनवण्यास सुरुवात केली गेली. सुरुवातीला ही नाणी तांब्याची होती. त्यानंतर १९६४ साली अ‍ॅल्युमिनियम आणि नंतर १९८८ साली स्टीलपासून नाणी तयार करण्यास सुरुवात झाली.

Video : गोष्ट असामान्यांची : शाहिरीतून अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करण्यासाठी धडपडणारा स्वप्निल शिरसाठ

भारतात जवळपास २२ अधिकृत भाषा आहेत. यापैकी भारतीय चलनावर १५ भाषांमध्ये माहिती देण्यात आली आहे. या १५ भाषांमध्ये उर्दू भाषेचा देखील समावेश आहे. उर्दूसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तामिळ आणि तेलुगू या भाषांचा समावेश आहे.

भारतीय चलनाला रुपया म्हटलं जातं त्याचप्रमाणे भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, मॉरिशियस, मालदीव आणि इंडोनेशिया या देशातील चलनाला देखत रुपया म्हटलं जातं.

Story img Loader