गोष्टींच्या पुस्तकांमधील राक्षसाप्रमाणे काही जणांना गणिताची देखील लहानपणी अनेकांना खूप भीती वाटायची. या विषयाचा अभ्यास किंवा परीक्षा म्हणजे अनेक जणांच्या कपाळावर आठ्या यायच्या. काही सोपी ट्रिक वापरून कठीण वाटणारे गुणाकार आणि भागाकार सोडवता येतील का अशी इच्छा कधीनाकधी लहान मुलांच्या मनात आलीच असेल. या इच्छेप्रमाणे एका व्यक्तीने चक्क गुणाकार करण्याची सोप्पी ट्रिक शोधून काढली आहे. याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. काय आहे ही ट्रिक जाणून घ्या.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बोर्डवर गुणाकार करताना दिसत आहे. पण हा गुणाकार करण्यासाठी तो एक अनोखी पद्धत वापरतो. बोर्डवर लिहलेल्या नंबरप्रमाणे तो उभ्या रेषा काढतो आणि ज्या संख्येने गुणाकार करायचा आहे, तेवढ्या आडव्या रेषा काढतो. नंतर या आडव्या आणि उभ्या रेषा जिथे जिथे एकमेकांना स्पर्श करतात, तिथे डॉट काढून ते डॉट्स मोजून खाली लिहतो, तयार झालेला आकडा हे त्या गुणाकाराचे उत्तर आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला अधिक स्पष्ट होईल.
आणखी वाचा : आजीच्या मृत्यूबद्दलच्या Linkedin पोस्टमुळे बड्या कंपनीचा CEO ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ तान्सू यागेन या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गुणाकार करण्याची ही भन्नाट ट्रिक नेटकऱ्यांना आवडली आहे.