Viral Video : वेळेचे महत्त्व खूप कमी लोकांना माहिती आहे. एक मिनिट, एक सेकंद किती महत्त्वाचा असतो, याची आपण अनेकदा कल्पनाही करू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला एका सेकंदाचे महत्त्व कळेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ पार्कमधील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक स्वीमींग पूल दिसेल त्यात अनेक मगरी दिसेल. एक मगर स्वीमींग पूलच्या बाहेर उभी आहे. या मगरीपुढे एक माणूस उभा आहे. तो मगरीपुढे जातो. तेव्हा मगरीचे तोंड उघडे असते. तो माणूस मगरीच्या तोंडात हात टाकतो आणि लगेच एक सेकंदात बाहेर काढतो. आणि मगर लगेच तोंड बंद करते. फक्त एका सेकंदामुळे त्या माणसाचा हात वाचतो. तो जागेवरून उठतो आणि त्याच्या आजुबाजूला जमलेलेल्या लोकांचे आभार मानतो. तो एक कलाकार आहे. तो अशा प्रकारच्या कला सादर करत असावा. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला एका सेकंदाची किंमत कळेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “एका सेकंदाची किंमत पाहा”
हेही वाचा : VIDEO : लंडनच्या रस्त्यावर ‘मोहब्बतें’ची क्रेझ; व्यक्तीनं व्हायोलिनवर वाजवलं गाणं अन्… तरुणीही पडली प्रेमात
पाहा व्हायरल व्हिडीओ
video_creator.s.s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मृत्यूला स्पर्श करून लगेच परत येणे, याला म्हणतात.” तर एका युजरने लिहिलेय, “एक सेकंद नव्हे तर मायक्रो सेकंदची किमंत जाणून घ्या.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मृत्यूच्या तोंडातून जो बाहेर पडतो, त्याला सिकंदर म्हणतात.” एक युजर लिहितो, “यमराजबरोबर बसणे उठणे आहे भाऊंचे” तर एक युजर लिहितो, “कोणत्याही प्राण्याला आपल्या मनोरंजनासाठी त्रास देऊ नये.
यापूर्वी सुद्धा मगरीचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. काही महिन्यापूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक हरिण एका पाण्याच्या तळापाशी पाणी पित आहे. मात्र या तळ्यात मगर लपून बसली आहे आणि वेळ मिळताच ती संधी साधणार आहे याचा बिलकुल अंदाज हरणाला नव्हता. तेवढ्यात पाण्यातून मगर बाहेर येते आणि हरणाचं तोंड आपल्या जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करते , मात्र चपळ हरीण अतिशय सहजपणे मगरीच्या तावडीतून सुटते. हा व्हिडीओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.