Viral Video : महाराष्ट्राला प्रचंड मोठा गडकिल्ल्यांचा इतिहास लाभला आहे. गडकिल्ले ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. हे गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतात. सोशल मीडियावर अनेक गडकिल्ल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक शिवप्रेमी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भेट देतात आणि तेथील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एक दुर्ग दाखवला आहे आणि आपल्याला तो दुर्ग ओळखायचा आहे. (do you know which fort is this watch viral video and identify)
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक दुर्ग दिसेल. या उंच गडावर एक दरवाजा दिसेल. या दरवाज्यातून सुंदर हिरवागार निसर्ग दिसतोय. पुढे व्हिडिओ तुम्हाला एक तरुण दिसेल जो हा गड चढताना दिसतोय. हा उंच आणि सुंदर दुर्ग पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ७५ हजार हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.
हेही वाचा : Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
the.travelling_soul या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणता दुर्ग आहे?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “स्वर्गात गेल्यासारखे वाटतंय व्हिडिओ बघून” तर एका युजरने लिहिलेय, “अखंड हिंदुस्थानचे बाप एकच छत्रपती श्री शिवाजी महाराज” आणखी एका युजरने लिहिलेय, “गोरखगड 100% बरोबर आहे” एक युजर लिहितो, “काय सुंदर दृश्य आहे.” अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये ‘गोरखगड’ लिहिलेय. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
हेही वाचा : ‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
कोणता दुर्ग आहे?
गोरखगड हा मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणांहून अगदी जवळ असलेला किल्ला आहे. आकर्षक शिखरांमुळे हा किल्ला अतिशय लोकप्रिय आहे. गोरखगडला जाण्यासाठी मुंबईकर कल्याण आणि पुणेकर कर्जत मार्गे मुरबाडला जाऊ शकतात. म्हसे जंक्शनवरून धसई गावात पोहोचायचे. तेथून देहरी गावात जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत.