आपण अनेकदा अनेक ठिकाणी बुलडोजर पाहतो. त्याचा प्रचंड आकार पाहून आणि आवाज ऐकून आपण हैराण होतो. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का, की या बुलडोजरचा रंग नेहमी पिवळाच का असतो. बुलडोजरला लाल, निळा, काळा किंवा पांढरा असे रंग का दिला जात नाही? वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला असता बुलडोजरला पिवळा रंग देण्यामागेही एक उचित कारण आहे. आज आपण हे कारण जाणून घेऊया.

एका रिपोर्टनुसार, बुलडोजरचा रंग आधीपासूनच पिवळा नव्हता. त्यावर इतर रंगांचेही प्रयोग करण्यात आले आहेत. जेव्हा ५०च्या दशकात बुलडोजर तयार करण्यात आले होते तेव्हा त्यांचा रंग लाल आणि पांढरा ठेवण्यात आला होता. तथापि, या रंगांवरून बरीच चर्चा झाली. कारण वैज्ञानिक दृष्ट्या हे रंग योग्य नव्हते. यानंतर रंग बदलण्यावरून चर्चा झाल्यानंतर पिवळा रंग निश्चित करण्यात आला.

Yuzvendra Chahal’s Hat-Trick : हॅटट्रीकनंतर युझवेंद्र चहलने मैदानावर दिली ‘ती’ खास पोझ; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पिवळा रंग निवडण्यामागेही अनेक तर्क आहेत. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पिवळा रंग अधिक चमकदार आहे. कोणत्याही बांधकामाच्या ठिकाणी हा रंग सर्रास वापरला जातो. जेणेकरून हा रंग लांबूनच दृष्टीस पडेल.

बुलडोजर हा शब्द दोन शब्दांपासून मिळून बनला आहे. हे शब्द म्हणजे Bull आणि Dose. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बुलडोजर म्हणजे अशी मशीन जी मोठमोठी कामे अगदी सहज पार पाडते. या मशीनच्या मदतीने एखादी वास्तू उभारता येते तसेच एखादी विशाल वास्तू जमीनदोस्तही करता येऊ शकते. बुलडोजरचेही अनेक प्रकार आहेत. जसे की क्रॉलर, व्हील, हायब्रीड, शिप आणि मल्चर बुलडोजर.