Viral Post : सोशल मीडियावर अनेक गमती जमती, व्हायरल व्हिडीओ, अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी इतक्या मजेशीर असतात की पाहून पोट धरून हसायला येते तर काही गोष्टी पाहून मन भावूक होते. काही लोक नवनवीन गोष्टी शेअर करतात तर काही लोक जुने आठवणी ताज्या करतात. सोशल मीडियावर नव्वदच्या दशकातील अनेक फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते फोटो किंवा व्हिडीओ पाहून अनेकदा लहानपणीचे दिवस आठवतात आणि जुन्या आठवणी पुन्हा डोळ्यांसमोर येतात. सध्या अशीच एक पोस्ट समोर आली आहे. या पोस्टमध्ये एका नाण्याचा फोटो शेअर केला आहे. हे नाणे पाहून काही लोकांना बालपणीचे दिवस आठवतील. (do you remember this 50 paise do you use aath aana)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “सावकाश ये भावा, मालक…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट पाटी; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला आठ आणेचे एक जुने नाणे दिसेल. ज्यावर ५० पैसे असे लिहिले आहे आणि त्यासमोर हे नाणे कधीचे आहे, हे वर्ष सुद्धा लिहिलेय. हे नाणे १९८५ या वर्षीचे आहे. या पोस्टवर विचारले आहे, “हे आठ आणेचे नाणं कोणी वापरलं आहे?” या आठ आणेचा फोटो पाहून तुम्हालाही तुमचे जुने दिवस आठतील. काही लोकांना या आठ आण्यांपासून काय मिळायचं, हे आठवेल. नव्वदच्या ऐंशी आणि नव्वदच्या दशकात हे नाणं जास्त प्रचलित होते.

पाहा व्हायरल पोस्ट, येथे क्लिक करा…

हेही वाचा : पेट्रोल पंपावर कर्मचारी गाडीत इंधन भरत असताना मागेहून स्कूटीने आलेल्या तरुणीनं केलं असं की..; Video व्हायरल

Latest Marathi Jokes या फेसबूक अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हाला आठवते का?”
या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्या वेळी मोठी रक्कम होती ही एक लिटर रॉकेल मिळत असे” तर एका युजरने लिहिलेय, ” मी वापरले आहे. अजुन काही नाणी आहेत माझ्या कडे नोटा पण आहेत एक रुपया, दोन रूपये,पाच रूपये आहेत जपून ठेवली आहेत” आणखी एका युजरने लिहिलेय, “हो आम्ही व्यवहार केला आहे या ५० पैशांचा” या पोस्टवर अनेक युजर्सनी जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you remember this 50 paise do you use aath aana photo goes viral on social media ndj