Viral Video : पैसा ही माणसाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही. कोणतेही काम करायचे असेल तर पैसा लागतो. त्यामुळे प्रत्येक जण पैसा कमावण्याचा विचार करतो. हल्ली या डिजिटल युगामध्ये सर्व काही डिजिटल झाले. ऑनलाइन पेमेंटमुळे लोक खिशात पैसे सुद्धा ठेवत नाही पण पूर्वी खिशात पैसे असायचे. एखादी नोट जर फाटली किंवा खराब झाली तरी जीव कासावीस व्हायचा. तेव्हा ती फाटलेली नोट पुन्हा जोडण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले जायचे. तुम्ही जोडली आहे का फाटलेली किंवा खराब झालेली नोट? सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती खराब झालेली २० रुपयांची नोट चिकटपट्टीच्या मदतीने जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसेल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला कात्री आणि चिकटपट्टी दिसेल. ही व्यक्ती चिकटपट्टीच्या मदतीने २० रुपयांची फाटलेली नोट जोडण्याचा प्रयत्न करत आहे. अतिशय एकाग्रतेने तो नोट जोडण्याचा प्रयत्न करत आहे. नोट जोडल्यानंतर ती व्यक्ती ही २० रुपयांची नोट त्याच्या पाकिटात ठेवते आणि तिथून निघून जाते. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मिळालेली टिप कामाच्या घाईत अजून फाटून निकामी होऊ नये म्हणून चाललेला प्रयत्न”
fish.on.dish या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपण दिलेली छोटीशी टीप कोणासाठी किती महत्वाची ठरू शकते, हे कधी कधी शब्दांत सांगता येत नाही.” fish.on.dish हे सीफूड रेस्टॉरंट आहे. आणि ही व्यक्ती येथील कर्मचारी आहे ज्याला टिप मध्ये ही २० रुपयांची नोट मिळाली होती.

हेही वाचा : “निळ्याशार लाटेला खाकीची सुरक्षा!”, मुंबई पोलिसांनी शेअर केली खास पोस्ट; विराट कोहलीने केले तोंडभरून कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/fish.on.dish/

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जे काही असेल ती त्याची पहिली टीप असेल म्हणून तो तिला जतन करून ठेवत असेल किंवा त्याला खरंच त्या वीस रुपयांची व्हॅल्यू खूप वाटत असेल पण हा व्हिडिओ इमोशनल आहे. बॅकग्राऊंड म्युझिक च सगळं सांगून जातं. सगळ्या ठिकाणी सगळ्या परिस्थितीत सगळीकडे आपल्याला फक्त एक करायचं माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला पाहिजे… बास” तर एका युजरने लिहिलेय, “आई ग….. डोळ्यात पाणी आल खरच… २० रुपयांची खरी किंमत आज समजली मला” आणखी एका युजरने लिहिलेय, “रिकामा खिसा…सर्व काही शिकवून जाते”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you repair a torn note a young guy is repairing 20 rupees note emotional video goes viral on social media ndj
Show comments